

पोलादपूरः गेले चार-पाच दिवस दडी मारणार्या पावसाने शनिवारी दुपारनंतर ढगांच्या गडगडातसह पर्जन्यवृष्टी केल्याने पोलादपूर तालुक्यात ठिकठिकाणी डोेंगरभागातील माती, दरड रस्त्यावर आल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. रविवारी ही दरड जेसीबीच्या सहाय्याने बाजुला करण्यात आली.
जोरदार पावसामुळे पोलादपूर-वाई-सुरूर राज्यमार्गावरील कापडे खुर्दच्या पुढे मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. तर निवे-ताम्हाणे गावाकडे जाणार्या रस्त्यावर दगड व माती झाडाच्या फांद्या आल्याने या मार्गवरील वाहतूक ठप्प झाला होती. शनिवारी रात्री उशिरा पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील मातीचा ओसरा बाजूला काढल्याने वाहतूक पूर्वत सुरू होती.निवे-ताम्हणे मार्गावरील मातीचा ओसरा रविवारी दुपारपर्यंत बाजूला करण्यात आला. तालुक्यातील विविध मार्गावर दरडींसह मातीचे ढिगारे रस्त्यावर येत आहेत. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडत आहेत. याचा परिणाम स्थानिक वाहतुकीवर होत आहे.
घाट माथ्यावर पडल असलेल्या मुसळधार पावसाने मुसळधार पाऊस पडल्याने महाबळेश्वर मार्गावरील घाटात कापडे खुर्द पोलादपूरच्या हद्दीत रस्त्यालगत दरड खाली आली होती. रात्री उशिरा माती बाजूला करण्यात आली. तालुक्यातील ग्रामीण भागात जाणार्या निवे ताम्हाणे गावाच्या रस्त्यावर मातीचा ओसरा आल्याने सकाळी पोलादपूरकडे येणार्या नागरिकांची गैरसोय झाली होती. या घटनेची माहिती मिळताच रविवारी दुपारपर्यंत माती व दगड बाजूला करण्यात आले.