बारावीच्या निकालात मुंबई विभागात रायगड अव्वल, मुलींचेच वर्चस्व कायम

HSC Result 2026 Raigad news | विज्ञान शाखेत ९८.५७ टक्के, वाणीज्य ९१.२९ टक्के तर तांत्रिक विज्ञान ९२.४० टक्के निकाल निकाल
HSC Result 2026
HSC Result 2026
Published on
Updated on

रायगड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागांतर्गत फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी (एचएससी) परीक्षेचा निकाल आज आॅनलाईन जाहीर झाला. यामध्ये रायगड जिल्ह्याने आपली यशाची परंपरा कायम ठेवत मुंबई विभागात आपले स्थान अव्वल राखले आहे. रायगडचा विज्ञान शाखेचा निकाल ९८.५७ टक्के लागला आहे. तर वाणीज्य शाखेचा ९१.२९ टक्के तर तांत्रिक विज्ञान शाखेचा निकाल ९२.४० टक्के लागला आहे.

HSC Result 2026
CBSE 10th result : वेळेआधी दहावीचा निकाल जाहीर; CBSEच्या कार्यक्षमतेची झलक

नियमित विद्यार्थी शाखानिहाय सविस्तर निकाल

रायगड जिल्ह्यातील नियमित विद्यार्थ्यांच्या निकालात विज्ञान शाखेने सर्वाधिक यशाची टक्केवारी नोंदवली आहे. विज्ञान शाखेचा जिल्ह्याचा निकाल ९८.५७ टक्के लागला आहे. यामध्ये मुलींनी ९८.९० टक्के मुंलींनी तर मुलांनी ९८.२४ टक्के मुलांनी यश मिळवले आहे. वाणिज्य शाखा शाखेचा एकूण निकाल ९१.२९ टक्के लागला असून, मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.७८ टक्के इतकी उच्च आहे. कला शाखेचा जिल्ह्याचा निकाल ८६.०३ टक्के लागला आहे. येथेही ९१.५० टक्के मुली तर ८०.४५ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. येथेही मुलींनीच बाजी मारली आहे. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा निकाल ८९.५९ टक्के लागला आहे.रायगड जिल्ह्यातील नियमित विद्यार्थी शाखा निहाय उत्तीर्ण प्रमाण

शाखा / प्रविष्ट विद्यार्थी / उत्तीर्ण विद्यार्थी / एकूण टक्केवारी

  • विज्ञान / १४,०६२ / १३,८६२ / ९८.५७%

  • वाणिज्य / १०,४८५ / ९,५७२/ ९१.२९%

  • कला / ५,४५०/ ४,६८९/ ८६.०३%

  • व्यवसाय अभ्यासक्रम / ३९४ /३५३ /८९.५९%

  • तांत्रिक विज्ञान (Tech-Sci)/७९/७३/ ९२.४०%

HSC Result 2026
CBSE 10th result : वेळेआधी दहावीचा निकाल जाहीर; CBSEच्या कार्यक्षमतेची झलक

पुनर्परिक्षार्थी र्विद्यार्थ्यी निकाल

ज्या विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा दिली होती, त्यामध्ये देखील रायगड जिल्ह्याची कामगिरी समाधानकारक आहे. यामध्ये विज्ञान शाखा निकाल ८२.४०% , कला शाखा ७२.४६% तर वाणिज्य शाखा निकाल ६९.०२% लागला आहे.

HSC Result 2026
ICSE results : आयसीएसई निकालात मुलींची पुन्हा बाजी

यंदाच्या निकालाची वैशिष्ट्ये

विज्ञान, कला आणि वाणिज्य या तिन्ही प्रमुख शाखांमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. तांत्रिक विज्ञान शाखेत परीक्षेला बसलेल्या १० पैकी १० मुली उत्तीर्ण झाल्या असून या शाखेचा निकाल ९२.४०% लागला आहे. ठाणे, पालघर आणि मुंबईच्या तुलनेत रायगडने विज्ञान शाखेत ९८.५७% य़श प्राप्त करुन उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news