

ठळक मुद्दे
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली आहे
रायगड जिल्हा सर्वात जास्त पाऊस माथेरान येथे २५४.६ मी.मी एवढा पडला
रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यातील शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय
रोहे (रायगड) : महादेव सरसंबे
रायगड जिल्ह्यात गुरुवार (दि.14) पावसाने सुरुवात झाली तर गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले आहे. मंगळवार ( दि. 19 ) रोजी आज पाचव्या दिवशीही मुसळधार सुरुच आहे. रायगड जिल्ह्यात सरासरी १८८.४६ मी.मी. पाऊस पडला असून माथेरान येथे २५४.६ मी.मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील महाविद्यालय आणि शाळांना सुट्टी देण्यात आली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पावसाचा जोर कायम असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्वच नद्यानाले तुडुंब भरून वाहत आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठले आहे. रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यात बहुतंअशी ठिकाणी १०० मीमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे काही ठिकाणी तर २०० मी.मी. पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. रायगड जिल्हा सर्वात जास्त पाऊस माथेरान येथे २५४.६ मी.मी एवढा पडला आहे. सोमवारी ( दि. 18 ) पडलेल्या पावसामुळे सोमवारी नदी नाल्यांना पूर आला होता. त्याच प्रमाणेच परिस्थिती असल्याने जिल्हा प्रशासनाने मंगळवारी ( दि. 19 ) शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यातील शाळा महाविद्यालय मंगळवारी बंद ठेवण्यात आले आहेत.
गेली पाच दिवस मुसळधार पाऊस पडत आहे मंगळवारी ( दि. 19 ) सुद्धा पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोहा शहराचा तालुक्यातील ग्रामीण भागात ( दि. 19 ) सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. गेली पाच दिवस पावसाने रोहा शहरास तालुक्यातील ग्रामीण भागात थैमान घातले आहे. मुसळधारमुळे नदी नाले तुडुंब भरले असून डोंगर माथ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने भुवनेश्वर व निवी नि मार्गावर पाणी आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. रोह्यात २२३ मीमी पावसाची नोंद वर्तविण्यात आली आहे. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.