Kokan Heatwave Alert: कोकणात उष्णतेची लाट; मुंबई-ठाण्यासह रायगडला हवामान विभागाचा अलर्ट

भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा प्रादेशिक केंद्राने कोकणातील जिल्ह्यांसाठी पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. पाहा ​पुढील ४ दिवस कसे असणार कोकणातील हवामान?
Kokan Heatwave Alert
Kokan Heatwave Alertfile photo
Published on
Updated on

Kokan Heatwave Alert

​रायगड : भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा प्रादेशिक केंद्राने कोकणातील जिल्ह्यांसाठी पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, उत्तर कोकणात कडाक्याच्या उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. १० आणि ११ मार्च रोजी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Kokan Heatwave Alert
Doomsday Fish: महाप्रलय येणार? समुद्रकिनाऱ्यावर दिसले 'अशुभ' मानले जाणारे मासे; काय असतो संकेत? पाहा Video

कोकणातील कोणत्या जिल्ह्याला कोणता इशारा?

पालघर, ठाणे आणि मुंबई: या तिन्ही जिल्ह्यांसाठी आज (दि. १०) 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. येथे काही ठिकाणी 'तीव्र उष्णतेची लाट' येण्याची दाट शक्यता आहे. तर उद्या ११ मार्च रोजी येथे उष्ण व दमट हवामान राहील.

रायगड: रायगड जिल्ह्यासाठी आज 'यलो अलर्ट' देण्यात आला असून, जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात उष्णतेची लाट जाणवेल. पालघर-ठाण्याप्रमाणेच येथेही ११ मार्च रोजी हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज आहे.

​रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग: दक्षिण कोकणातील या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मात्र पुढील पाचही दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असून, येथे उष्णतेच्या लाटेचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

​पुढील ४ दिवस कसे असणार कोकणातील हवामान?

​कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये १२ मार्चपासून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांतील वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी आणि घराबाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी उष्माघातापासून वाचण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.

Kokan Heatwave Alert
Neem Leaves Benefits: उन्हाळ्यात कडुलिंबाची पाने का खावीत? आयुर्वेदानुसार आरोग्यदायी फायदे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news