

मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे
मुरुडच्या गोमुख समुद्र किनारा विकासाच्या प्रतीक्षेत असून, या परिसराचा विकास झाला तर पर्यटनाला चालना मिळेल, स्थानिकांचा रोजगारही वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रायगडचे दक्षिण काशी म्हणून समजले जाणारे मुरुड जंजिरा एकदरा डोंगरापलीकडे समुद्रकाठी वसलेले शंकराचे पवित्र स्थान म्हणजे गोमुख (गायमुख). येथील परिसर इतका सुंदर आहे की गोमुख समोर विशाल भव्य लाटा असलेला समुद्र, डाव्या बाजूस अभेद्य जंजिरा किल्ला. उजव्या बाजूस पद्मदुर्ग किल्ला, काळ्या खडकात डोंगराच्या कपारीत वसलेले हे गोमुख पर्यटकांना अतिशय आवडते ठिकाण आहे. शंकराचे जागरूक स्थान असल्याने महाराष्ट्रातून येथे अस्थी विसर्जनासाठी लोक येतात. सायंकाळी सूर्यास्तावेळी दगडावर बसून ध्यान धारणा करणे अनेक भक्त रोज हजेरी लावतात अशा विशेष पर्यटन स्थळाला विकासासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
खासदार सुनील तटकरे यांनी एकदरा पूल ते गोमुख मार्गे खोरा बंदर रास्ता करून परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी प्रस्ताव तयार केला. परंतु पुढे कोणतीही हालचाल झाली नाही. जर तो प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्षात झाला तर मुरुडला दाखवण्यासारखे 1 पर्यटन स्थळ होईल. मुरुडला येणार प्रत्यक्ष पर्यटक खोरा बंदराला भेट देतो. त्यातूनच तो खोरा बंदरच्या मागिलबाजूस जाऊन समुद्राच्या लाटांचा आनंद घेत गायमुखाचे दर्शन करेल आणि मुरुडच्या सुंदर समुद्रकिनारी उतरेल अशी संकल्पना तटकरे यांची होती. ती पूर्ण ह्यावी अशी मुरुडकरांची मागणी आहे
गोमुखावर महाशिवरात्रीला सकाळपासून भक्तांची दर्शनासाठी रांग लागते . सद्य भक्तांना एकदरा गावातून खराब रस्तावरुन चालत जावे लागते. सुशोभकारांचा प्रस्ताव झाला तर भक्त व पर्यटक आपली गाडी गोमुखावर घेऊन जाऊशकतात व या निसर्गातील अजुबाचे दर्शन घेऊन शकतात. निर्सगरम्य एकदरा पूल ते खोरा बंदर काळ्या खडकावरून समुद्राच्या खुशीत रास्ता होणार आहे. परदेशाला लाजवेल असा निसर्गरम्य देखावा होईल. मुरुडचा गोल्डन नेकलेस पॉईंट म्हणून देशभरात प्रसिद्ध होईल. एका बाजूस जंजिरा किल्ला तर दुसर्याबाजूस शिवरायांचा पद्मदुर्ग किल्ला. त्याच्या मध्ये होणारा सुर्यास्त पर्यटक आपल्या गाडीतून पाहू शकेल असा हा रस्ता होणार आहे.
गायमुखावर निसर्गाचा खराखुरा आनंद घेण्यासाठी परिवारातील सर्वजण नियमित जात असतो. .सायंकाळी लालसर सूर्यप्रकाशात समुदाच्या लाटांना जोर असतो त्यावेळी समुद्राचे पाणी देखील सोनेरी हाते.हा अनुभव खुपच रोमांचकारी असा आहे. इतके सुंदर पर्यटन स्थळ असून त्याचा विकास का होत नाही .येथे रस्ता झाल्यास सर्वानाच या पर्यटन स्थळाचा आनंद लुटता येईल.
अर्चना नवले, पर्यटक