Gomukh Beach of Murud | मुरुडचा गोमुख समुद्र किनारा विकासाच्या प्रतीक्षेत

गोमुख परिसराचे सुशोभिकरण झाल्यास मुरुडच्या अजून एका पर्यटनस्थळाची भर
Gomukh Beach of Murud
मुरुडचा गोमुख समुद्र किनारा विकासाच्या प्रतीक्षेतPudhari Photo
Published on
Updated on
मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे

रायगडचे दक्षिण काशी म्हणून समजले जाणारे मुरुड जंजिरा एकदरा डोंगरापलीकडे समुद्रकाठी वसलेले शंकराचे पवित्र स्थान म्हणजे गोमुख. येथील परिसर इतका सुंदर आहे कि गोमुख समोर विशाल भव्य लाटा असलेला समुद्र, डाव्या बाजूस अभेद्य जंजिरा किल्ला, उजव्या बाजूस पद्मदुर्ग किल्ला काळ्या खडकात डोंगराच्या कपारीत वासलेल्ये हे गोमुख पर्यटकांना अतिशय आवडते ठिकाण आहे.

शंकराचे जागरूक स्थान असल्याने महाराष्ट्रातून येथे अस्थी विसर्जनासाठी लोक येतात. सायंकाळी सूर्यास्तावेळी दगडावर बसून ध्यान धारणा करणे अनेक भक्त रोज हजेरी लावतात. अशा विशेष पर्यटनस्थळाला विकासासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

रायगडचे खा. सुनील तटकरे यांनी एकदरा पूल ते गोमुख मार्गे खोराबंदर रस्ता करून परिसराचे सुशोभीकर करण्यासाठी प्रस्ताव तयार केला. परंतु पुढे कोणतीही हालचाल झाली नाही, जर तो प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्षात झाला तर मुरुडला दाखवण्यासारखे हे एक पर्यटन स्थळ होईल.

मुरुडला येणार प्रत्यक्ष पर्यटक खोरा बंदराला भेट देतो. त्यातूनच तो खोरा बंदरच्या मागिलबाजूस जाऊन समुद्राच्या लाटांचा आनंद घेत गायमुखाचे दर्शन करेल आणि मुरुडच्या सुंदर समुद्रकिनारी उतरेल अशी संकल्पना तटकरे साहेबांची होती. ती पूर्ण व्हावी अशी मुरुडकरांची मागणी आहे.

गोमुखावर महाशिवरात्रीला सकाळपासून भक्तांची दर्शनासाठी रांग लागते. सद्य भक्तांना एकदरा गावातून खराब रस्तावरुन चालत जावे लागते. सुशोभकारांचा प्रस्ताव झाला तर भक्त व पर्यटक आपली गाडी गोमुखावर घेऊन जाऊ शकतात व या निसर्गातील अजुबाजूचे दर्शन घेऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news