

नेरळ ( रायगड ) : आनंद सकपाळ
माथेरान नगरपालिका कर्मचारी मंडळाच्या गणेशोत्सवाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.
जनतेमध्ये राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाचे आयोजन व या उपक्रमामुळे लोकांना एकत्र येऊन राष्ट्रीय एकता आणि अभिमानाची भावना निर्माण करण्यास मदतीच्या हेतूमधून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ मध्ये गणपती उत्सवाची सुरुवात सुरुवात करण्यात आली होती. त्या मध्येच स्वातंत्र्यापूर्वी देशात मोठ्या प्रमाणावर जातीभेदाचे चित्र होते. मात्र जातीभेद हा माथेरान नगरपालिकेच्या प्रथम श्रेणी १ च्या अधिकारी वर्गाने ते श्रेणी ४ च्या कर्मचाऱ्यांना एका माळेत बांधून १९५० साली नगरपालिका कर्मचाऱ्यांनी एकत्र येत या गणेशोत्सव मंडळाची स्थापना करून या गणेश-ोत्सवातून मोडित काढत जुनी समाज बाधक परंपरा दूर करत नवी परंपरा अंगीकृत करत, तेव्हापासून सलग ७५ वर्षे हे मंडळ गणेशोत्सव हा माथेरान करसनदास मुळजी प्रधानालयात सामाजिक दृष्टीकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत यंदाचा गणेश उत्सव हा आमृत मोहत्सव म्हणून साजरा करीत आहे.
गणेश उत्सव मंडळाची स्थापना १९५० साली झाली. मात्र बाप्पांची स्थापना करण्यासाठीच्या जागेची अडचण समोर आली. त्यावर ही त्यावेळी तोडगा म्हणून प्रधानालयाची जागा देण्यात आली. त्यानंतर सर्वअधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वर्गणीतून तत्कालीन लिपिक यशवंत हेडगे, दिवंगत वसंत मोरे आणि दिवंगत गोविंद जोशी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी प्रयत्न सुरू केले. हे प्रयत्न तत्कालीन नगराध्यक्ष दिवाकर गोपाळराव शिंदे यांची उत्तम साथ मिळाल्यामुळे शिंदे यांनी संरक्षित अशी जागा ही कायम केल्यामुळे माथेरान डोंगराच्या घाटमाथ्यावर हा गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात सुरू केला आहे, तेव्हापासून गेल्या ७५ वर्षात मुख्याधिकाऱ्यांपासून ते सर्वच कर्मचाऱ्यांनी ही आपली परंपरा जोपासत हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाचा अमृत महोत्सवी गणेश उत्सव हा अध्यक्ष प्रवीण सुर्वे, सचिव रवी लोटणकर व मंडळाचे पदाधिकारी तसेच सभासद यांच्या देखरेखीत साजरा केला जात आहे. या गणेश उत्सवामध्ये अधिकारी ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वधर्म समभावाची आपली परंपरा जोपासत एका छत्रछायेखाली येत आहेत.
त्यावेळेस शिक्षणाला अधिकचे महत्व होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी तत्कालीन शिक्षक छोटाभाई खान यांनी या मंडळात निबंध, वक्तृत्व, काव्यप्रपंची आयोजन, एकांकिका असे विविध उपक्रम राबून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती आवड निर्माण केली व ती परंपरा मंडळाकडून आजही शिक्षणाचे हित हे विद्यार्थ्यांप्रती जोपसले जात आहे.
माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेमध्ये आदिवासी बांधवही काम करत होते. त्यांना गणेशोत्सवात सामील करून घेणे व त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम होत आहे. आजही आदिवासी बांधवांचे नृत्याविष्कार सादर केले. ते सर्व कर्मचारी आपापल्या सार्वजनिक कार्यातून सादर करतात.