

मुंबई : गिरगावातील पहिली सुतार गल्ली येथे चौरसिया समाज बाल मित्र मंडळाने ३९ वर्षा निमित्त ७५ किलो खडूचा वापर करून गणपती बाप्पाची गोजिरवाणी मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी गिरगावात रोज गर्दी जमत आहे. मूर्तीचा मुख्य ढाचा घडवण्याचे काम लालबाग चिंचपोकळी येथील प्रसिद्ध मूर्तिकार अजित घाडीगावकर यांनी केले आहे तर ढाच्यावर खडू रचून गणपतीला एक वेगळ रूप देण्याचे काम मंडळाच्या काही होतकरू कार्यकर्त्यांनी केले आहे.
गेल्या वर्षी चौरसिया मंडळाने ड्रायफूट पासून गणपतीची आकर्षक मूर्ती साकारली होती. मोरपंख, सुपारी रुद्राक्ष, डायमंड, मोती ह्या वस्तून पासून ह्यापूर्वी मंडळाने गणपतीचे सुंदर रुपे साकारले आहेत. प्रत्येकी वर्षी अनोख्या पद्धतीन मंडळ मूर्ती साकारण्याचे काम करत
असल्यामुळे व्ही.पी रोड पोलीस ठाण्याने चौरसिया समाज बाल मित्र मंडळाला आतापर्यंत तिन वेळा विशेष पुरस्कार दिला असल्याची माहिती मंडळाचे सचिव निलेश चौरसिया यांनी दिली आहे. गिरगावातल्या बोलालवाडीजवळ राहणारा चौरसिया समाज गेल्या शंभर वर्षांपासून मुंबईत कलकत्ता, बनारसी, मगाई पानांचा व्यापार करत आले आहेत. ही मंडळी पानांचा घाऊक व्यापार करत आले आहेत. गणपतीवर अपार श्रद्धा असल्याने चौरसिया समाजातील काही मंडळींनी मिळून पहिल्या सुतार गल्लीत गणपतीची स्थापना केली होती. स्थानिक रहिवाशांसाठी मंडळनेव यंदा मेडिकल कॅम्प, लहानांसाठी चित्रकला स्पर्धा, महिलांसाठी खास आरती थाळी सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे.