

CSTL JNPT railway route
पनवेल : सीएसटीएल–जेएनपीटी मार्गावर धावणारी एक मालगाडी गुरुवारी (दि.४) दुपारी सुमारे साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान नवीन पनवेल रेल्वे पुलाखाली अचानक रुळावरून घसरली. ही घटना पनवेल रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ घडल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
प्राथमिक माहितीनुसार, जेएनपीटीकडे जाणारी ही मालगाडी पुलाखालील वळणावर येताच अचानक डब्बे डगमगत रुळाबाहेर गेले. मोठा अपघात टळला असला, तरी काही डब्यांचे नुकसान झाले.
या दुर्घटनेमुळे सीएसटीएल–जेएनपीटी मार्गावरील मालवाहतूक काही काळ प्रभावित झाली. जवळच असलेल्या पनवेल स्थानक परिसरात पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. प्रवासी गाड्या या मार्गावरून धावणाऱ्या नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास झाला नाही.