Raigad Accident | कंत्राटदाराचा निष्काळजीपणा बेतला जीवावर; काशिद-चिकणी मार्गावर वनरक्षकाचा खड्ड्यात कोसळून मृत्यू

Forest Guard Death | मुरुड तालुक्यातील काशिद-चिकणी मुख्य रस्त्यावर शुक्रवारी रात्री दुर्घटना
Kashid Chikni Road Accident
वनरक्षक सुरज सारंगेPudhari
Published on
Updated on

Kashid Chikni Road Accident

रेवदंडा : नव्याने बांधण्यात येत असलेल्या मोरीच्या खड्ड्यात दुचाकी कोसळून अलिबाग वनविभागातील तरुण वनरक्षक सुरज सारंगे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मुरुड तालुक्यातील काशिद-चिकणी मुख्य रस्त्यावर शुक्रवारी (दि.६) रात्री १०:३० च्या सुमारास ही घटना घडली. कंत्राटदाराने कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे कोणतेही निकष न पाळल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करत वनरक्षक संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आनंदावर विरजण: जुळ्या मुलांच्या स्वागतानंतर काळाचा घाला

सुरज सारंगे हे अलिबाग वनविभागातील तिनविरा येथे वनरक्षक म्हणून कार्यरत होते. अवघ्या पाच दिवसांपूर्वीच त्यांना जुळ्या मुलांचे पितृत्व लाभले होते. दोन्ही बालके कालच रुग्णालयातून घरी आली होती. या आनंदाच्या क्षणांचे स्टेटस त्यांनी मोबाईलवर ठेवले होते. मात्र, मुरुड तालुक्यातील सर्वे येथील आपल्या घरी जात असताना नियतीने त्यांच्यावर घाला घातला आणि एका उमद्या अधिकाऱ्याचा अंत झाला.

Kashid Chikni Road Accident
Raigad Accident News | अहिल्यानगरच्या शिवभक्तांचा रायगड–माणगाव मार्गावर अपघात घाटातील धोकादायक वळण अपघाताला कारणीभूत

सुरक्षेचा अभाव: कंत्राटदारावर गंभीर आरोप

रेवस-रेड्डी मार्गाचे काम सध्या सुरू आहे. सर्वे नजीक चिकणी जवळ नवीन मोरी बांधण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. महाराष्ट्र वनरक्षक व वनपाल संघटनेचे अलिबाग अध्यक्ष मयुरेश तायडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तिथे कंत्राटदाराचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे.

अपघाताची प्रमुख कारणे:

कामाच्या ठिकाणी कोणतेही बॅरिकेट्स लावले नव्हते.

वाहनचालकांसाठी कोणतेही सूचना फलक नव्हते.

रात्रीच्या वेळी खड्डा दिसावा यासाठी रेडियम पट्ट्या किंवा लाल दिवे बसवण्यात आले नव्हते.

अंधार असल्याने सारंगे यांना खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि त्यांची दुचाकी थेट खोल खड्ड्यात कोसळली.

Kashid Chikni Road Accident
Raigad Road Accidents 2025: रायगडचे रस्ते ठरतायत मृत्यूचा सापळा; वर्षभरात 627 अपघातांत 258 जणांचा बळी

सखोल चौकशीची मागणी

या घटनेमुळे संपूर्ण वनविभागात आणि रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. कंत्राटदार आणि संबंधित प्राधिकरणाच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वनरक्षक व वनपाल संघटनेने पत्रकाद्वारे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news