आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल करा

महाड, पोलादपूरमधील मुस्लिम समाजाची मागणी
Nitesh Rane
नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन देताना मुस्लिम समाज. file photo

महाड : महाड तालुक्यात बकरी ईदच्या दुसऱ्या दिवशी ईसाने कांबळे गावात गोवंश हत्येच्या झालेल्या घटनेनंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन केलेल्या वक्तव्याविरोधात महाड मधील मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. आमदार राणे यांना तातडीने अटक करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाला दिला आहे.

बकरी ईदच्या दुसऱ्या दिवशी इसाने कांबळे गावात गोहत्या झाली होती. यामुळे महाडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणातील संशयितांवर गुन्हे दाखल केले. मात्र दोन दिवसानंतर आमदार नितेश राणे यांनी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिसांकडून योग्य कारवाई होत नाही, गुन्हेगारांना अभय दिला जात आहे, असा आरोप करत पोलिस प्रशासनाला धरेवर धरले होते. यादरम्यान मुस्लिम समाजाबाबत राणे यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप महाड पोलादपूरमधील मुस्लिम समाजाने केला आहे.

Nitesh Rane
दाढेगाव ग्रा.पं. सदस्याचे थेट शाळेच्या पत्र्यावरच आमरण उपोषण

आमदार राणे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महाड पोलादपूर येथील मुस्लिम समाजाने दिला आहे. या मागणीचे निवेदन महाडचे डी.वाय.एस.पी शंकर काळे यांच्यासह महाडचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news