दाढेगाव ग्रा.पं. सदस्याचे थेट शाळेच्या पत्र्यावरच आमरण उपोषण

१६५ विद्यार्थ्यांचे जीव मुठीत घेऊन शिक्षण; नवीन इमारतीची मागणी
Movement of Gram Panchayat Member
शाळेला नवीन इमारत बांधावी, यासाठी राजू काकडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.file photo
अशोक गायकवाड

शहापूर : अंबड तालुक्यातील दाढेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे शाळेला नवीन इमारत बांधावी, या मागणीसाठी शाळेच्या मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतीच्या पत्र्यावरच दाढेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला संपूर्ण ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे.

दाढेगाव येथील जिल्हापरिषदेची शाळा मोडकळीस आली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे. देशात डिजिटल इंडिया आणि ई-लर्निंगच्या वल्गना केल्या जात असताना दाढेगाव येथील शाळेला मात्र धड इमारतही नाही. शाळेच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने विद्यार्थी मात्र जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. शाळेची नवीन इमारत व्हावी या मागणीसाठी गेल्या एक वर्षांपासून ग्रा.स. राजू काकडे आणि ग्रामस्थांच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याासह मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी यांना देखील वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. प्रशासनाने मात्र या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा दिल्या आहेत.

Movement of Gram Panchayat Member
जरांगेंच्या आंदोलनस्‍थळासह घरावर अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, चौकशीची मागणी

१६५ विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

दाढेगाव येथील जि.प. शाळेत १ली ते ५ वी पर्यंत एकूण १६५ विद्यार्थी आहेत. मात्र ज्या वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात, त्या धोकादायक स्वरूपात आहेत. शाळेच्या इमारतीच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत, तसेच छतावरील पत्रे फुटल्याने पावसाचे पाणी वर्गात शिरत आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने काकडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news