Fake certificate case : बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा

एमआयडीसी कर्मचाऱ्यावर कारवाई
Fake certificate case
बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हाFile Photo
Published on
Updated on

महाड : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाड येथील कार्यालयात नोकरी मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2023 ते 13 मार्च 2025 या कालावधीत एमआयडीसी महाड येथील यांत्रिकी विभाग कार्यालयात घडल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामदास पांडुरंग सावंत, रा. एमआयडीसी कर्मचारी वसाहत, नांगलवाडी, महाड (मूळ राहणार वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 336(2), 336(3) आणि 340(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fake certificate case
Matheran alternative road : पर्यायी रस्त्याची माथेरानकरांना प्रतीक्षाच

आरोपीने लिपिक-टंकलेखक पदावर नोकरी मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. हे प्रमाणपत्र शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा (जीसीसी) नोव्हेंबर 1994 मधील मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट या विषयाचे असल्याचे दाखविण्यात आले होते,मात्र तपासात हे प्रमाणपत्र खोटे व बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Fake certificate case
Thane News : पालिकेतील पोस्को गुन्ह्यातील कर्मचाऱ्याला अटकपूर्व जामीन मंजूर

या प्रकरणाचा पुढील तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. फडतरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news