Murud Tourism : गतवर्षीच्या तुलनेत मुरुडमध्ये पर्यटक संख्या कमीच

तीव्र उन्हाळ्याचा परिणाम; उष्म्याने पर्यटक हैराण; फक्त दीड ते दोन हजार पर्यटक दाखल
Murud Tourism
गतवर्षीच्या तुलनेत मुरुडमध्ये पर्यटक संख्या कमीचpudhari photo
Published on
Updated on

मुरुड जंजिरा :सुधीर नाझरे

मुरुड शहरात सध्या पारा सकाळी 36 अंश सेल्सिअस असतो. सकाळपासून गरम वातावरण असल्याने समुद्राच्या गार पाण्यात कुल कुल होण्यासाठी पर्यटक मुरुडला उन्हाळी सुट्टी मुरुडला एन्जॉय करण्यासाठी आले आहेत. गेली 2 दिवस अतिशय गरम असल्याने पर्यटक वातानुकूलित रूममधून बाहेर पडत नाहीत. त्यामुळे प्रचंड तापमानामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत पर्यटकांची संख्या कमीच आहे.

राज्यात सर्वत्र परीक्षांचे निकाल लागले. सुट्टी जाहीर झाल्याने कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे पर्यटकांनी धाव घेतली आहे. पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी आहे. सुट्टी लागून आलेल्या वीकएण्डमुळे पर्यटनप्रेमींना मोठा लाभ झाला असून, मुरुड शहरात सायंकाळी अल्हाददायक व सुंदर वातावरण आहे. समुद्र हळूहळू उसळू लागला असल्याने मासेमारी धोक्यात आहे. माशांची अवाक घटल्याने पर्यटकांना महाग मासे घ्यावे लागत आहेत. मुरुडला आलो आणि मासे खाल्ले नाही तर मन राहत नाही. महाग असले तरी मासे खाणार अशी पर्यटकांची धारणा आहे.

Murud Tourism
Murud summer vacation tourism : उन्हाळी सुट्टीत काशीद, मुरूड बीच पर्यटकांनी फुलले

पर्यटक मुरुड समुद्रकिनारी असलेली वातानुकूलित हॉटेला पहिली पसंती देत आहेत. मुरुडचा पारा 38 वर गेल्याने मुंबई-पुणे येथील पर्यटक लहान मुलांसाठी वातानुकूलित हॉटेल बुक करत आहेत. मासळी कमी असल्याने पर्यटक किनाऱ्यावरील, नवनवीन चविष्ट पदार्थांचे स्टोलवर, पाणीपुरी, भेळ पुरी अशा विविध पदार्थंची चव घेत आहेत.

नगरपालिकेने समुद्रकिनारी असलेली विश्राम धाम ही बागेचे नूतनीकरण केल्याने त्याचा लाभ येणाऱ्या पर्यटकांना होणार आहे. पालिकेचे कर्मचारी समुद्रकिनारी दिवसातून 3 वेळा स्वच्छ करतात. मुरुडला असणारे जलदुर्ग जंजिरा व पद्मदुर्ग पर्यटकांसाठी सज्ज झालेत. मुरुडपासून जवळच असणारे गारंबी धारण, कुडे मांदाड लेणी, खोकरी, दत्तमंदिर या पर्यटन स्थळावर स्वच्छता करून खाण्या पिण्याचे स्टॉल करण्यात आलेत. सलग सुट्टी असल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पर्यटक कमी आहेत.

Murud Tourism
Raigad tourism: रायगडमध्ये उन्हाळी पर्यटनाला बहर; महागाईचा चटका असूनही पर्यटकांचा ओघ कायम

आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन

जंजिरा किल्ला पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी सकाळी 9 ते 11 पर्यंत किल्ल्यात जाऊन यावे. जाताना नास्ता व भरपूर पाणी प्यावे. अतिशय गरम्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे. जंजिरा किल्ल्यात फिरताना पर्यटकांनी उन्हापासून संरक्षण होईल याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news