E-Rickshaw Strike in Matheran : माथेरानमधील ई रिक्षा संप चिघळणार

बैठकीत पालकवर्ग कमाली आक्रमक
E-Rickshaw Strike in Matheran
माथेरानमधील ई रिक्षा संप चिघळणारpudhari photo
Published on
Updated on

माथेरान ः मिलिंद कदम

माथेरानमध्ये ई रिक्षा मध्ये वाढ व्हावी याकरिता सुरू झालेल्या संपाने वेगळे वळण घेतले असून विरोधक ही आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून ई रिक्षा वाढी करता आक्रमक झाले आहेत. मंगळवारी झालेल्या बैठकीच्या ा वेळी रिक्षा संघटनेबरोबर विद्यार्थ्यांना ई रिक्षा मिळाव्या याकरिता पालक वर्ग आक्रमक झालेला दिसला.

माथेरान मध्ये मानवी प्रथा बंद व्हावी याकरिता इ रिक्षा चालकांनी कालपासून बेमुदत बंद केला आहे परंतु शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या असून या काळामध्ये विद्यार्थ्यांना ही सेवा मिळत नसल्याने पालक वर्ग आक्रमक झाला आहे व ई रिक्षा बंद ठेवण्यावर हात रिक्षा चालक-मालक संघटनाही ठाम असल्यामुळे पालक वर्गाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

E-Rickshaw Strike in Matheran
Sexual Exploitation Case : लग्नाचे आमिष, ब्लॅकमेलिंग, अत्याचार प्रकरणी नागेश गावडे यास कारावास

यामध्ये ई रिक्षाला विरोध करणारेही आक्रमक झाल्याचे आज दिसून आले आहे त्यामुळे ई रिक्षा सर्वांनाच हवी असल्याचे सध्यातरी दिसत आहे त्यामुळेच लवकरात लवकर निर्णय व्हावा याकरिता उद्या सर्व पालक अधीक्षक यांची भेट घेऊन प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा सात ई रिक्षा फक्त विद्यार्थ्यांकरिता सुरू कराव्यात अशी मागणी करणार आहेत.

E-Rickshaw Strike in Matheran
Direction Boards Theft : शहापूरमध्ये दिशादर्शक फलक भंगार चोरांच्या निशाण्यावर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news