Sexual Exploitation Case : लग्नाचे आमिष, ब्लॅकमेलिंग, अत्याचार प्रकरणी नागेश गावडे यास कारावास

भादवी अंतर्ग विविध कलमे आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलमांखालीही शिक्षा सुनावण्यात आली
Sexual Exploitation Case
Sexual Exploitation CasePudhari File Photo
Published on
Updated on

अलिबाग : लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर वारंवार अत्याचार व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नागेश पोपट गावडे (वय 43) यास येथील जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. तिवारी यांनी आज 14 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणात भारतीय दंड विधान कलम 376 (2)(एन) अन्वये 14 वर्षे सश्रम कारावास व 1 लाख 50 हजार रुपयेदंड, तर कलम 376 अन्वये 10 वर्षे सश्रम कारावास व 1 लाख रुपये दंड न्यायालयाने ठोठावला आहे. तसेच भादवी अंतर्ग विविध कलमे आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलमांखालीही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Sexual Exploitation Case
Illegal Drugs Seizure : तळोजात ‌‘हाय व्हॅल्यू‌’ ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुलै 2013 ते जून 2015 या कालावधीत आरोपी नागेश पोपट गावडे याने पीडितेस लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. स्वतःचे आधीचे लग्न लपवून ठेवत तिची फसवणूक केली. तसेच पीडितेचे खासगी व्हिडिओ चित्रीकरण करून त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करत जबरदस्तीने अत्याचार केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. लग्नाच्या बहाण्याने पैसे देखील उकळण्यात आले होते.

या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड.कोमल राठोड यांनी 17 साक्षीदार तपासून न्यायालयात युक्तिवाद केला. तपास अधिकारी अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक के.पी. साळे व त्यांच्या पथकाने जलदगतीने तपास पूर्ण करून न्यायालयासमोर ठोस पुरावे सादर केले.

Sexual Exploitation Case
KDMC Property Tax Department : कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन लिपिकांचे तत्काळ निलंबन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news