Dry Fish Prices: सुक्या मासळीचे दर वधारले; पावसाळ्यासाठी सुक्या मासळीला अधिक मागणी

पावसाळ्यात बेगमीसाठी ओल्या मासळी बरोबर सुक्या मासळीला मागणी वाढली आहे.
Dry Fish Market
Dry Fish MarketPudhari
Published on
Updated on

कोलाड: सद्या जुन महिना सुरु झाला असुन मासळीचा हंगाम अंतिम टप्यात आला असल्यामुळे सुक्या मासळीला अधिक मागणी वाढली आहे. पावसाळ्यासाठी सुखी मासळीची साठवण केली जाते. यामुळे सुक्या मासळीची मागणी वाढल्यामुळे सुक्या मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. पावसाळ्यात बेगमीसाठी ओल्या मासळी बरोबर सुक्या मासळीला मागणी वाढली आहे.

Dry Fish Market
Street Vendors: ऑनलाईनच्या जमान्यातही फिरत्यांची क्रेझ; एक्स्चेंज ऑफर्सचे महिला ग्राहकांना आकर्षण

राज्यभरातून सुक्या मासळीला मागणी असते. त्यामुळे मासळीची मोठी बाजारपेठेत असलेल्या ठिकाणी सुकी मासळी सुकविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असुन जवला (सुकट ), बोंबील, मांदेली, कोळंबी, बांगडा, माकटी, अंबाड, मासेसुकट, ही बाजाराच्या ठिकाणी विक्रीसाठी आणले जात आहे.

Dry Fish Market
Karjat Railway Station: कर्जतकर रेल्वे प्रवाशांना मिळतोय मोठा दिलासा; भिसेगाव दिशेकडील तिकीट खिडकी दोन शिफ्टमध्ये सुरू

परंतु येरवी कमी असणारे भाव एका किलो मागे डबल वाढले असल्याचे बाजारात पहावयास मिळत आहे. पावसाळ्यासाठी सुक्या मासळीची साठवण करण्यासाठी सुक्या मासळीची मागणी वाढल्यामुळे त्यांचे दर ही वाढले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news