पुरस्कार परत करत असल्याचे डॉ. धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र

पुरस्कार परत करत असल्याचे डॉ. धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र
Published on
Updated on

अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ निरूपणकार डॉ. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लेटरहेडचा गैरवापर करून पुरस्कार परत करत असल्याचे बनावटपत्र अज्ञातांकडून समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आले आहे. या प्रकरणी रेवदांडा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

'माझ्या सर्व श्री सेवकांना मी आवाहन करतो की, इथून पुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका. मी लवकरच पुरस्कार आणि राशी सरकारला परत करत आहे. जय सदगुरू.', असा मजकूर डॉ. धर्माधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरीने व्हायरल करण्यात आला आहे.

'या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रेवदंडा पोलिस ठाण्यात सुरू आहे,' असे रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. दरम्यान, या बनावटपत्राबाबत धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनेही रितसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news