

पोलादपूर: दीपावली म्हणजे दिव्यांचा सण. दिवाळी म्हटलं की घरासमोर असणारा आकाशकंदील, पणत्या, रांगोळी घराची शोभा वाढवतात. दिवाळीचा सण सुरू झाला असून ठिकठिकाणी विविध रंगी आकाश कंदील रंगेबिरंगी लाईट लक्ष वेधून घेत आहेत. सध्या बाजारात विविध प्रकारचे आकाशकंदील दिसून येत आहेत.
दिवाळीसाठी संपूर्ण बाजारपेठ विविध प्रकारच्या वस्तूंनी सजते. त्यात विविध रंगांचे आकर्षक कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात.
बाजारात कागदी, प्लास्टिक, ग्लासपासून बनवलेले आकाश कंदील आहेत. ग्राहकांकडूनही या आकर्षक कंदिलांना मोठी मागणी आहे. इतर साहित्यापासून तयार केलेले कंदील सह मातीचे कंदील विकत घेण्यास ग्राहक प्राधान्य दर्शवत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
अनेक वर्षांपूर्वी बांबूच्या काड्या आणि कागद यांच्या मदतीने घरातच बनवलेले कंदील वापरले जात. नंतर त्यांची जागा प्लास्टिकच्या कंदिलांनी घेतली, परंतु गेल्या काही वर्षांत पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती होत असल्याने नागरिक कापडी कंदील सह इतर पर्यावरण पूरक कंदिलांचा ला प्राधान्य देत आहेत त्यातच काही ग्राहक एकदा वापरता येईल असा कंदील खरेदी करत आहेत त्या साठी विविध प्रकारचे कंदील बाजारात दाखल झाले आहेत.
२० ते २५ वर्षापूर्वी कागदापासून तयार केलेले आकाश कंदिल मिळत आहेतच. तेच आकाश कंदिल बाजारपेठेत फेरफटका मारताना जास्त प्रमाणात दिसून येत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदिलांचे ५० रुपयांपासून ते 2800 रुपयांपर्यंत दर आहेत. त्याचबरोबर दारासमोर लावण्यासाठी लहान आकाश कंदिलांनाही ग्राहकांकडून मागणी असल्याचे विक्रेते सांगतात.
प्लास्टिकचे छोटे आकाश कंदील 60 ते 320 रुपये डझन विकले जात आहेत. वेगवेगळे रंगीबेरंगी, प्लास्टिकच्या वापराने तयार करण्यात आलेले आकाश कंदिल विक्रीसाठी आलेेत. डेकोलाइट, स्केअर, लोटस, प्लॉअर, बलून या पद्धतीच्या आकारातील कंदिलांनी बाजारपेठ सजली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले कंदिलही आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठेबरोबर, महाड औद्योगिक वसाहत, बिरवाडी, पोलादपूर शहर, कापडे या भागात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत थोडा दर वाढलेला असल्याचे विक्रेते सांगतात. आकाश कंदिलचे दर वाढलेले असले, तरी ग्राहकांकडून कंदील घेण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे अशी महिती व्यवसायिकांनी दिली.
पर्यावरणपूरक कंदील
टाकाऊ वस्तूंपासून, ज्यूट, सुती कापड आणि हाताने बनवलेल्या कागदापासून तयार केलेले कंदील बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
एलईडी कंदील
आतूनच प्रकाश व्यवस्था असणारे सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहेत. बाजारपेठेतील कल हॅन्डमेड उत्पादनांना मागणी: स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या आकाश कंदीलांना आणि मातीच्या पणत्यांना नागरिक प्राधान्य देत आहेत.