

सुधीर नाझरे
मुरुड जंजिरा: हवामानखात्याकडून दरवर्षी खोलसमुद्रातील मासेमारी 31 मे पासून बंद करण्याचे आदेश देते. परंतु ह्यावर्षी खराब हवामान असलयाने व मासळीचा दुष्काळ असल्याने मच्छिमार आपली बोट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 400 यांत्रिक बोटी किनाऱ्यावर ओढली. पुढील 3 महिने मासेमारी बंद असल्याने कोळी बांधव पाऊसपर्वीच्या तयारीला लागलेत.
पूर्वी कोळीबांधव एकत्र येऊन दोरीने बांधून बोटी किनाऱ्यावर ओढत असत, परंतु आता मानवशक्ती कमी झाल्याने ती जागा मशीनने घेतली ट्रॅक्टर ला बांधून बोट किनाऱ्यावर ओढली जाते बोटी खाली मोठे लाकूड बांधून बोट किनारीवर स्थिर करण्यात येते व बोटीच्या वरिलभागात लाकडी पट्टीचे छपरं बांधले जाते व नंतर प्लस्टिक बांधून पावसाळी सुरक्षण केले जाते. बोटीला जाळी कडून समुद्राच्या पाण्यानी स्वच्छ धुऊन उन्हात सुकवून जाळी दुरुस्त करून घरात सुरक्षित ठेवले जातात.
बोटीतील इंजिन ऑइल काढण्यात येते कारण पुढील 3 महिने बोट बंद असलयाने इंजिन खराब होऊनये म्हणून प्लस्टिकमध्ये बांधून सुरक्षित करण्यात येते. बोटीचा पंखा काढण्यात येतो. बोटीच्या खालील भागाला ऑइल लाऊन पाण्यापासून सुरक्षित करतात हे किनाऱ्यावरील सर्व मोठी बोटीनं बाबतीत होते.
छोट्या बोटी खाडीत मासेमारी करतात व पाऊस सुरू झाल्यावर मात्र कोळी बांधव किनाऱ्यावर रापण करून मासेमारी करून आपले पोट भारतात ,पावसाळी समुद्र किनारी लाटांसोबत चिकट फेस वाहून येतो तो खाण्यासाठी मासे किनारी येतात. तयावेळी प्रचंड लाटांमध्ये जाळी टाकून 8 ते 10 कोळीबांधव जाळी किनारी ओढतात ,जाळ्यात आलेल्या मासळी विकून आपली उपजीविका चालवतात.