Murud Beach News | काशीद बीच येथे बुडालेल्या पुण्यातील पर्यटकाचा मृतदेह सापडला

Raigad News | मंगळवारी समुद्रात पोहताना तरुण बेपत्ता
Murud  Kashid Beach Tourist Death
रेस्क्यू टीमला अवघ्या 45 मिनिटांमध्ये बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला (Pudhari Photo)
Published on
Updated on

Murud Kashid Beach Tourist Death

रायगड : पुण्याहून पर्यटनासाठी आलेला २० वर्षीय युवक तनिष्क मल्होत्रा काशीद बीच (ता. मुरुड) येथे मंगळवारी (दि. १) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पोहताना बुडून बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह आज (दि.३) सकाळी ८.४५ वाजता किनाऱ्या पासून दोन किमी अंतरावर एका खडकावर सापडला, अशी माहिती सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे प्रमुख सागर दहिंबेकर यांनी 'दै. पुढारी' शी दिली.

मंगळवारी तनिष्क बेपत्ता झाल्यावर मुरुड पोलिसांकडून शोध घेण्यासाठी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला प्राचारण केले होते. तसेच भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या साह्याने शोध कार्य सुरु केले होते.  परंतु, बेपत्ता झालेल्या तनिष्कचा  शोध लागला नाही. अखेर रेस्क्यू टीमने पुणे येथून ॲडव्हान्स थर्मल ड्रोन आणून आज सकाळी सात वाजता शोधकार्य चालू केले. अवघ्या 45 मिनिटांमध्ये बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केले. पुढील तपास मुरुड पोलीस करत आहेत.

Murud  Kashid Beach Tourist Death
Raigad Rain | रायगड जिल्ह्याला मोठा दिलासा: दमदार पावसामुळे धरणांमध्ये ८३% पाणीसाठा, १७ धरणे तुडुंब

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news