

नेरळ : नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील दामत या गावातील एका तरूणाविरोधात लहान मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नेरळ पोलीस ठाण्यात या तरूणा विरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तरूणाला नेरळ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे नेरळ भागात खळबळ माजली आहे.
नेरळ पोलीस ठाणे ही6तील दामत येथील राहणारा जमीर तांबोळी याने 6 जानेवारी रोजी दुपारचे दोन वाजण्याचे सुमारास त्याच गावातील पीडित लहान मुलगा याला घोडे शोधण्याच्या बहाण्याने स्वतःच्या दुचाकीवर बसून शेलु परिसरातील जंगल परिसरात नेले. त्या ठिकाणी आरोपी जमीर यांने पिडित मुलाचे मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करत त्याच्यासोबत अश्लीलकृत्य केल्याची घटना घडली आहे.
सदर घटनेनंतर पीडित मुलाने घडलेला संपूर्ण प्रकार हा आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर तात्काळ निर्णय घेत पिडित मुलाच्या घरच्यांनी थेट नेरळ पोलीस ठाणे गाठून ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात येताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी राहुल वरोटे यांनी तात्काळ तपास सुरू करत दामत येथील राहाणार आरोपी जमीर तांबोळी याला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.
संशयित आरोपीविरोधात बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक पोस्को अधिनियम 2012 चे कलम चार-आठ व बारा तसेच भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 351 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हा नेरळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे या करीत आहेत. या घटनेचा संपूर्ण दामत व परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नेरळ पोलीस ठाण्यात या तरूणा विरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तरूणाला नेरळ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.