Clay Pot Water Demand: उन्हाळ्याची चाहूल लागताच माठांची मागणी वाढली; ‘गरीबांचा फ्रीज’ पुन्हा घराघरात

थंडगार व आरोग्यदायी पाण्यासाठी मातीच्या माठांना पसंती; कुंभार समाजालाही रोजगार
Clay Pot Water Demand
Clay Pot Water DemandPudhari
Published on
Updated on

खोपोली : प्रशांत गोपाळे

उन्हाची चाहुल लागताच अनेकांचे पाय गरीबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा माठ यांच्याकडे वळत असल्याचे दृश्य सध्या अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. मार्च महिना सुरु झाल्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणारे माठ ठिकठिकाणी विक्रीस आले आहेत.

Clay Pot Water Demand
Karjat Gang Externment: कर्जतमधील सराईत गुन्हेगारांना केले तडीपार

माठाचे पाणी आरोग्यासाठी लाभदायक असून या पासून अनेक फायदे होत असतात. यामुळे अनेकजण उन्हाळ्यामध्ये माठ खरेदी करीत असतांना पहावयास मिळत आहे. होळीच्या नंतर उन्हाची दाहकता वाढत आहे.यामुळे या माठाचे महत्व आजही आबाधित आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात सर्वसामान्यांची तहान भागविण्यासाठी पाणपोई म्हणून या माठाचा हॉटेल, तसेच विविध ठिकाणी वापर केला जात असल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी उन्हाळ्याच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहे.फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस उन्हाच्या झळा सौम्य स्वरुपाच्या होत्या मात्र होळीच्या नंतर उन्हाचा दाह वाढू लागली आहे.

Clay Pot Water Demand
Bavdhan Bagad Yatra Wai: बावधनची ऐतिहासिक बगाड यात्रा सुरू; ५० फूट उंच बगाड ओढण्यासाठी ५०० बैलांची जू

यामुळे येणारा उन्हाळा तीव्र स्वरूपाचा होणार असल्याचे तर्क नागारिक यांच्या कडून वर्तवले जात आहे. उन्हाळ्यांची चाहूल लागताच आपली तृष्णा शांत करण्यासाठी अनेकजण थंड पेय यांच्याकडे आकर्षित होत असतात. फ्रिजचे पाणी अनेकांना त्रास दायक असल्यांने प्रत्येक नागरीक माठ खरेदि करीत असतो. यामुळे कुंभार समाजाला रोजगार मिळत असतो. माठाला दरवर्षी उन्हाळ्यात मागणी वाढत असते. तरी सुद्धा श्रीमंत वर्गालाही या माठाचे आकर्षण आहे. माठातील थंडगार पाणी आणि चवीमध्ये माधुर्य असते.यामुळे माठाला गरीबांचा फ्रीज म्हटले असे संबोधले जाते.

Clay Pot Water Demand
Raigad Zilla Parishad: रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेपूर्वीच गोंधळ; अध्यक्ष-उपाध्यक्षांसाठी कार्यालयच नाही

उन्हाळ्यात प्रत्येकाला तहान भागवायला थंड पाण्याची आवशकता भासत असते. त्यामुळे गरिबांचा चविष्ठ आणि थंड पाण्यासाठी मातीचा माठ वापरला जातो. जुन्याकाळातील फ्रीज म्हणून मातीच्या माठाला संबोधले जाते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी थंड करून घेतलेले पाणी शरीरासाठी हितकारक असल्याने ग्रामीण भागात माठाला आज ही मागणी मोठी आहे

कांता श्रीधर सावंत, गृिहणी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news