

पेण: पेण-बेलवडे गावकऱ्यांना गेली दोन वर्षे सिडकोच्या जलबोगद्याचे कामामुळे भूगर्भातील पाणी नष्ट झाल्याने विहीरी बोअरवेल जमीनीतील ओलावा नष्ट झाल्याने पाण्याअभावी हाल होत आहेत.
शेती भाजिपाला वाल लागवड ही उत्पादने जमीनीत ओलावा नसल्याने घेता आली नाही. गावकऱ्यांनी सिडकोकडे 5 कि.मी. अंतरावरील जलवाहिनीवरुन पाणीपुरवठा पाईपलाईनची केलेली मागणी ती पूर्ण न केल्याने आ. रवींद्र पाटील, माजी खा. धैर्यशील पाटील, प्रांत प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी रुद्रावतार धारण करीत सिडकोचे अधिकारी पोतदार यांना चांगलेच फैलावर घेतले.
पाच दिवस अवधी देत जर का मागणी पूर्ण केली नाही तर तुमचे जर्मन तंत्रज्ञानावर आधारित वॉटर टनेलचे काम कायम बंद करण्याचा इशारा देण्यात आला. बैठकीतले वातावरण इतके तापले होते की आमदार खासदार नसते तर पुढचं काही खरं नव्हत एरवी शांत संयमी असलेलं गावकरी नाकातोंडात पाणी गेल्यावर काय करतात याचा प्रत्यय सिडकोच्या नाकर्तेपणामुळे दिसून आला.
अन्यायाचा प्रतिकार कसा करावा हे कालच्या बैठकीत बेलवडे ग्रामस्थांनी एकजुटीने दाखवून दिला बैठकीत प्रसंगी पाणीपुरवठा अधिकारी सिडको अधिकारी पेण तालुका कृषी अधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य डी.बी.पाटील जलबोगद्याचे काम करणारी ठेकेदार कंपनी मेघा इंजिनिअरिंग इंजिनिअर पंचायत समिती उपसभापती संजय डंगर, माजी नगरसेवक शोमेर पेणकर,गावचे सरपंच हरेष पाटील, सामाजिक कार्यकर्ते हरेष बेकावडे मदन पाटील आणि दोनशे ते अडिचशे मराठा व आदिवासी समाजबांधव बैठकीत उपस्थित राहीले होते.
ठेकेदार कंपनी मेघा इंजिनिअरिंग द्वारे हेटवणे जलबोगद्याच्या कामानेबेलवडे ग्रामपंचायत मधील तीन गावे तेरा आदिवासी वाड्याव परिसरातील इतर गावांना याची झळ बसली आहे.गावांचे नैसर्गिक स्त्रोताचे पाणी कायमचे 300फूट खाली जलबोगद्यात गेले असून बोरिंग, तलाव, विहिरी पूर्णपणे आटलेल्या आहेत.
शिवाय नैसर्गिक स्त्रोत असलेले झरे नाले ओसाड पडलेले आहेत. त्यामुळे तात्काळ सिडकोच्या हेटवणे धरणाचे पाईपलाईन जोडणी करुन येणारे पाणी धामणी मार्गे सर्व गावांना देऊन दुष्काळ दूर करा. त्याचबरोबर जल बोगद्याच्या टनेल मधून येणारे दूषित पाणी सहा किलोमीटर लांब खाडीमध्ये तात्काळ सोडा.
या दोन मागण्या पाच दिवसांत पूर्ण करा अन्यथा टनेलचे काम बंद करण्यात येईल असा कडक इशारा आज बेलवडे दवणसर मुंगोशी गावातील संतप्त ग्रामस्थांनी प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत सिडको अधिकारी पोतदार यांना चांगलेच खडसावले आणि पाच दिवसांत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि भूगर्भातील सल्फर युक्त दूषीत पाणी थेट पाइपलाइन मधून खाडीमध्ये सोडा या दोन प्रमुख मागण्या, सरपंच हरेष पाटील सामाजिक कार्यकर्ते हरेष बेकावडे,संजय डंगर व अन्य गावातील तरुणांनी जोरदार मागणी करीत लावून धरल्याने अखेर पाच दिवसांनंतर सिडकोचा हिशोब कायम पुर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी न डगमगता पोलिस यंत्रणेसमोर अन्याय का सहन करायचा ही एकजूट दाखवून दिली.
आता येत्या पाच दिवसांत नेमक काय होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.करो या मरो अशा प्रकारे हे जन आंदोलन सिडकोच्या अधिकारी वर्गाने मागणी केलेली पाणीपुरवठा योजनेचे काम न केल्याने सिडकोच्या वॉटर टनेलचे कामाबाबत ठोस निर्णय काय लागणार हे सहाव्या दिवशी समजेल.
सिडकोने पाणी पुरवठा जलवाहिनी देण्याचे आश्वासन दिले आहे त्याची तातडीने पूर्तता करणे आवश्यक आहे. ती त्यांनी उद्भवलेल्या पाणी टंचाईसमस्येवर उपाययोजना तातडीने करावी जेणेकरून तीन महसुली गावे 13 आदिवासीवाड्यांसह बेलवडे मुंगोशी गावांना पाणीपुरवठा होईल.अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही न झाल्याने अखेर बैठकीत गावकऱ्यांचा संताप अनावर झाला.
- हरेष पाटील, सरपंच, बेलवडे ग्रामपंचायत पेण