Chirner Nag Panchami | नागपंचमीसाठी मुंबईत चिरनेरच्या नागमूर्तींचा थाट; 5 हजारांहून अधिक मूर्ती विक्रीसाठी रवाना!

Chirner Nag Panchami | कलानगरातून पाच हजारांहून अधिक नागमूर्ती विक्रीसाठी रवाना
Chirner Nag Panchami
Chirner Nag Panchami
Published on
Updated on

कोप्रोली : पुढारी वृत्तसेवा
उरण नागपंचमीला नागमूर्तींची मुंबईतून मोठी मागणी असते. दरवर्षी नागपंचमीच्या निमित्ताने चिरनेर-उरण कलानगरातूनच विविध आकाराच्या पाच हजारांहून अधिक नागाच्या मूर्ती मुंबईच्या बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात येतात. यावर्षीही श्रावणाच्या प्रारंभी गुरुवारी (१३) नागाच्या मूर्ती मुंबईत रवाना होणार असल्याची माहिती महिला मूर्तिकार निलम चौलकर यांनी दिली.

Chirner Nag Panchami
Maharashtra weather update : रायगड -पुणे -सातारा घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा

गुरुवार (१३) पासूनच श्रावणाला प्रारंभ होत आहे. सोमवारी सर्वत्र नागपंचमीचा सण साजरा करण्यात येणार आहे. श्रावणात येणाऱ्या नागपंचमीच्या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीनुसार स्त्रिया पारंपारिक वेषभूषा करून नागाची मूर्ती पाटावर ठेवून तिची घरच्याघरी विधिवत पूजा करतात.

ग्रामीण भागातल्या स्त्रिया तर अजूनही शेतावरच्या नागाच्या स्थानावर जाऊन विधिवत पूजा करतात. यावेळी रानातल्या नागवेलीला महत्त्व देऊन, त्या नागवेलीचीही महिला मोठ्या प्रमाणावर पूजा करतात. यावेळी नारळ, पुष्पहार, दूध, पेढे आणि लाह्या या नागदेवतेला प्रसाद म्हणून अर्पण करतात. शाडूच्या 'श्री' मूर्ती पाठोपाठ चिरनेर कलानगर 'नाग मूर्ती'साठीही प्रसिद्ध आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये या नागमूर्ती घडविल्या जातात.

विविध आकाराच्या नागमूर्ती घडविण्याच्या कामाला दोन महिन्यांपासून सुरुवात केली जाते. चिरनेरच्या कलानगरात नाग मूर्ती बनविण्याचे काम आठ कारखान्यात केले जाते. मागील अनेक पिढ्यांची परंपरा जोपासण्याचे काम कलानगरातील कुटुंब करीत आहेत. विविध आकाराच्या नागमूर्ती घडविणे, त्या सुकवणे, त्यानंतर रंगरंगोटी करण्याचे काम केले जाते.

कलानगरातील सुबक, आखीवरेखीव व आकर्षक नागमूर्तींना मुंबईच्या बाजारात मोठी मागणी असते. त्यामुळे दरवर्षी मुंबईच्या बाजारात नागाच्या मूर्ती पाठवण्यात येतात. यावर्षीही नागपंचमीसाठी चिरनेर कलानगरीतील कुंभार समाजाच्या महिला कारागिरांनी तयार केलेल्या पाच हजारांहून अधिक नागमूर्ती गुरुवारी (१३) मुंबईच्या बाजारात चार दिवस अगोदरच विक्रीसाठी रवाना करण्यात येणार असल्याची माहिती विक्रेत्या व मूर्तिकार निलम चौलकर यांनी दिली.

Chirner Nag Panchami
Raigad Dam Water Storage-रायगड जिल्ह्यातील २४ धरणे ओव्हरफ्लो

चिरनेर कलानगरात गणेशमूर्ती, नागमूर्ती, मातीची भांडी तयार करण्याचा कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. हिंदू संस्कृतीच्या विविध सण उत्सवांमुळे या धंद्यात चार पैसे मिळतात. मात्र मेहनत खूप करावी लागते. दोन महिने आधीपासून नागमूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात होते. लहान, मध्यम व साधारणता मोठ्या आकाराची मूर्ती २५ ते १०० रुपये किंमतीत किरकोळ दराने बाजारात विकल्या जातात. पीओपी आणि रंगांच्या किंमतीत यावर्षी ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहितीही विक्रेत्या व मूर्तिकार निलम चौलकर यांनी दिली.

  • कला व निर्मिती : चिरनेरच्या कलानगरातील ८ कारखान्यांमध्ये कुंभार समाजातील महिला व कुटुंबे गेल्या अनेक पिढ्यांपासून सुबक नागमूर्ती घडवण्याचे काम करतात.

  • मागणी व किंमत : लहान, मध्यम व मोठ्या आकाराच्या नागमूर्ती २५ ते १०० रुपयांपर्यंत विकल्या जातात. पीओपी आणि रंगांच्या किंमती ३०% नी वाढल्या तरी मुंबईत ५,००० हून अधिक मूर्तींना मोठी मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news