

रोहे ः मध्य रेल्वेद्वारे येत्या होळी सणात प्रवाशांच्या सोयीसाठी 20 अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे.चालवण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगांव - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (4 सेवा) चालवण्यात येणार आहे.
यामध्ये ट्रेन क्रमांक 01003 साप्ताहिक विशेष 2 आणि 9 मार्चरोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवारी 08.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मडगांव येथे 22.40 वाजता पोहोचेल. (2 सेवा),ट्रेन क्रमांक 01004 साप्ताहिक विशेष गाडी 01 आणि 08 मार्च रोजी दर रविवारी मडगांव येथून 16.30 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 05.50 वाजता पोहोचेल. (2 सेवा)
दिवा - चिपळूण - दिवा अनारक्षित विशेष (16 सेवा) चालवण्यात येणार आहे. यामध्ये ट्रेन क्रमांक 01159 अनारक्षित विशेष 1ते 8 मार्चपर्यंत दिवा येथून दररोज रात्री 11.25 वाजता सुटेल आणि चिपळूण येथे दुसऱ्या दिवशी 06.30 वाजता पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01160 अनारक्षित विशेष 1ते 08 मार्च पर्यंत चिपळूण येथून दररोज दुपारी 3.30 वाजता सुटेल आणि दिवा येथे त्याच दिवशी 11.10 वाजता पोहोचेल.
या गाडीला निळजे, तळोजा पांचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगांव, गोरेगांव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजणी हे थांबे देण्यात आले आहे.
या गाड्या अनारक्षित म्हणून चालवण्यात येतील आणि सुपरफास्ट मेल-एक्सप्रेस गाड्यांसाठी सारखे सामान्य शुल्क आकारले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
रायगड जिल्ह्यात चार थांबे
या गाडीला ठाणे नंतर रायगड जिल्ह्यात पनवेल, पेण, रोहा, माणगांव असे चार थांबे असून पूढे खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी हे थांबे देण्यात आले.विशेष ट्रेन क्रमांक 01003 साठी बुकिंग 28 फेब्रुवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि वेबसाइटवर सुरू होणार आहे.