Ashadhi Wari Special Trains | आषाढी यात्रेनिमित्त मध्य रेल्वेकडून दादर–पंढरपूर दरम्यान दोन विशेष गाड्या

२२ ते २९ जुलै या कालावधीत विशेष गाड्या धावणार
Ashadhi Wari Special Trains
Ashadhi Wari Special TrainsPudhari
Published on
Updated on

Dadar Pandharpur Express Wari Special Trains

रोहे : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने दादर–पंढरपूर दरम्यान दोन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. २२ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत या विशेष गाड्या धावणार असून, भाविकांना प्रवासासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहेत.

गाडी क्रमांक ०१०४५ (दादर–पंढरपूर विशेष) ही गाडी २४ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.५० वाजता दादर येथून सुटून त्याच दिवशी रात्री ९.१५ वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१०४६ (पंढरपूर–दादर विशेष) ही गाडी २६ जुलै २०२६ रोजी रात्री १२.१५ वाजता पंढरपूर येथून सुटून त्याच दिवशी सकाळी ११.४५ वाजता दादर येथे पोहोचेल.

या विशेष गाड्यांना ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी येथे थांबे देण्यात आले आहेत.

Ashadhi Wari Special Trains
Ashadhi Wari Marathwada Connection : आषाढीशी मराठवाड्याचे नाते

गाड्यांमध्ये दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, दहा शयनयान डबे, चार सामान्य द्वितीय श्रेणी डबे तसेच दोन द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.

गाडी क्रमांक ०१०४५ आणि ०१०४६ साठीचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.

आषाढी यात्रेदरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार आणखी विशेष गाड्या चालविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

प्रवाशांनी तिकीट आरक्षणासाठी रेलवन ॲपचा वापर करावा. तसेच विशेष गाड्यांच्या वेळापत्रकाची माहिती एनटीईएस ॲप किंवा भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे रेल्वे प्रशासनाने नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news