

Mumbai to Konkan AC Train
रोहे : उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकण मार्गावर ४ वातानुकूलित विशेष रेल्वे सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मडगाव दरम्यान धावणार आहेत.
गाडी क्रमांक ०११२९ (CSMT–मडगाव वातानुकूलित विशेष) ही गाडी १० एप्रिल आणि १४ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री ००.२० वाजता CSMT येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.
तर गाडी क्रमांक ०११३० (मडगाव–CSMT वातानुकूलित विशेष) ही गाडी १० एप्रिल आणि १४ एप्रिल रोजी मडगाव येथून सायंकाळी १६.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.४५ वाजता CSMT येथे पोहोचणार आहे.
या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
या विशेष गाडीची रचना १८ वातानुकूलित ३-टायर इकॉनॉमी डबे आणि २ जनरेटर व्हॅन अशी असणार आहे.
गाडी क्रमांक ०११२९ साठी आरक्षण सर्व PRS केंद्रांवर तसेच IRCTCच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच सविस्तर वेळापत्रकासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे किंवा NTES अॅपचा वापर करण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.