Central Railway summer special trains : उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मध्य रेल्वेच्या 46 गाड्या तैनात

मध्य रेल्वे मार्गावरील मडगाव एक्स्प्रेस सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ
Central Railway summer special trains
उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मध्य रेल्वेच्या 46 गाड्या तैनातpudhari photo
Published on
Updated on

ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरून कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मध्य रेल्वे मार्गावरून कोकणात उन्हाळ्यानिमित्त ज्यादा रेल्वे सेवा सोडण्यात येणार असून प्रवा रेल्वेच्या 46 गाड्या तैनात करण्यात येणार आहेत.

उन्हाळ्यानिमित बहुतांश मुंबईकर गावच्या ठिकाणी प्रवास करत असतात. अगोदर अशा स्थिती बहुतांश प्रवाशांचा बऱ्याच वेळा खोळंबा व्हायचा. परंतु मध्य रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे कोकण वासियांना मोठा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे प्रशासनाच्या सुरू होणाऱ्या 46 रेल्वे सेवा मध्य रेल्वे मार्गावरून कोकणात प्रवास करतील.

Central Railway summer special trains
Dahisar Kashigaon Metro: दहिसर–काशिगाव मेट्रोचा 3 एप्रिलला शुभारंभ; मिरा-भाईंदरकरांना मोठा दिलासा

मध्य रेल्वे मार्गावरून बऱ्याच एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वे नियोजित आहेत. मात्र त्यांपैकी काही विशेष रेल्वे सेवा प्रवाशांना उपलब्ध होतात. दिवा-रत्नागिरी पॅसेंजर, मत्स्यगंधा एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, मडगाव एक्स्प्रेस, पेण आणि रोहा-दिवा मेमू लोकल इतपत रेल्वे सेवा कोकण वासियांना उपलब्ध आहेत. आता त्यात अधिक 46 लोकल सेवांमुळे कोकणात प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळेल. दर दिवशी मोठ्या प्रमाणात प्रवासी कोकणात प्रवास करतात. तसेच प्रवाशांची गर्दीही सणांमध्ये वाढत असते. यावेळी मध्य रेल्वेच्या रेल्वेचे कोकण दौरे वाढणार आहेत.

Central Railway summer special trains
Pune Nagpur Vande Bharat: पुणे-नागपूर वंदे भारतला सुपरहिट प्रतिसाद; 35 कोटींचे उत्पन्न

सुमारे 13 लाख प्रवाशांचा प्रवास

मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवांमधून सुमारे 13 लाख प्रवासी नियमित प्रवास करत असतात. त्यांपैकी नियमितचे सुमारे 30 हजार प्रवासी कोकणात प्रवास करत असतात. अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा प्रवाशांना धक्काबुक्की, वाद, हाणामारी तसेच शाब्दिक वादाला सामोरे जावे लागत असते. त्याचप्रमाणे कधी चोरी, लूट सारख्या घटना देखील होत असतात. अशा प्रकारच्या घटना नियमित घडू नयेत यासाठी मध्य रेल्वेने 46 गाड्यांची उपाययोजना केल्याचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news