

अलिबाग : पर्यटकांसह परप्रांतिय यांच्यावर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यातील बंदरासह पोर्टमधेही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत जेणेकरून संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होईल.
जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. औद्योगिकीकरण वाढत असल्याने रोजगारासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून, राज्यातून कामगार दाखल झाले आहे. वेगवेगळ्या प्रांतातून कामगार म्हणून जिल्ह्यात अनेक मंडळी आले आहेत. याचाच फायदा घेऊन बांग्लादेशी जिल्ह्यात येण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे जिल्ह्यात बांग्लादेशी विरोधी पथकामार्फत कंपन्यांची तपासणी केली जात आहे. कामगारांची माहिती घेतली जात आहे.
औद्योगिकीकरणाबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्याला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे. अलिबाग, वरसोली, मांडवा, नागाव, आक्षी, किहीम, मुरूड, काशीद, रेवदंडा, बोर्ली, दिवेआगर, श्रीवर्धन अशा अनेक समुद्रकिनारी दहा लाखहून अधिक पर्यटक वर्षाला भेटी देतात.
दिवाळी, उन्हाळी सुट्टीबरोबरच शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी पर्यटक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येतात. वेगवेगळ्या समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद पर्यटक लुटतात. गेटवे ते मांडवा, भाऊचा धक्का ते मांडवा या सागरी मार्गाने बहुतांश पर्यटक येतात.
जिल्ह्यातील पर्यटकांसह नागरीकांच्या सुरक्षेसाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटनस्थळांसह लॅन्डींग पॉईंट आणि बंदराच्या ठिकाणी दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
रायगड पोलीस दलाच्या हद्दीत जिल्ह्यामध्ये २८ पोलीस ठाणे आहेत. त्यामध्ये अलिबाग, मांडवा सागरी, मुरूड, वडखळ, श्रीवर्धन, दिघी सागरी, पोयनाड, रोहा व रेवदंडा हे सागरी पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलिबाग, वरसोली समुद्रकिनारे, रेवस, मांडवा, जंगल, धरमतर, बांगमांडला, दिघी प्रवासी, पीएनपी, सानेगाव, जेएसडब्लू, राजपूरी जेट्टी असून दिघी पोर्ट या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
धरमतर पोर्टच्या ठिकाणी ५१ कॅमेरे
अलिबाग, मांडवा सागरी, मुरूड, वडखळ, श्रीवर्धन, दिघी सागरी, पोयनाड, रोहा व रेवदंडा हे सागरी पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलिबाग, वरसोली समुद्रकिनारे, रेवस, मांडवा, जंगल, धरमतर, बांगमांडला, दिघी प्रवासी, पीएनपी, सानेगाव, जेएसडब्लू, राजपूरी जेट्टी असून दिघी पोर्ट या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सानेगाव जेट्टीच्या ठिकाणी १६, दिघी पोर्टच्या ठिकाणी २१, धरमतर पोर्टच्या ठिकाणी ५१, मांडवा जेट्टीच्या ठिकाणी २४ व इतर ठिकाणी आठ, चार, तीन, दोन सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.