Car Accident: कार्लेखिंडीत कारचा अपघात; वाहनाचे मोठे नुकसान; जीवित हानी टळली

कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली आणि नंतर बाजूच्या नाल्यात घुसली.
Car Accident
Car AccidentPudhari
Published on
Updated on

अलिबाग: पनवेलहून येणाऱ्या एका कारचा आज पहाटे कार्ले खिंडीत अपघात झाला. पहाटे पडलेल्या पावसामुळे रस्ता ओला झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली आणि नंतर बाजूच्या नाल्यात घुसली.

Car Accident
Illegal Water Tanker Racket: गटारातून काढली बोअरवेलची पाइपलाइन!

या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणती जीवितहानी झाली आहे का, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे.

Car Accident
PM Modi 12 Years: मोदींच्या १२ वर्षांत भारताचा सर्वांगीण विकास: आ.संजय केळकर

अपघाताच्या वेळी कारमध्ये किती जण होते आणि ते सध्या कुठे आहेत, याची माहिती पोलीस घेत आहेत. दरम्यान, पावसामुळे रस्ते निसरडे झाले असल्याने वाहनचालकांनी सावधगिरीने वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news