Raigad Accident : उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांचा अपघातात मृत्यू

ताम्हिणी घाटात कोसळली कार
Raigad Accident News
उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांचा अपघातात मृत्यू
Published on: 
Updated on: 

रायगड : पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात १२०० फूट खोल दरीत कार कोसळून झालेल्या भीषण अपघातात माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांचा जागीच मृत्यू झाला. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहिमेत त्यांचा मृतदेह आढळला. तपासादरम्यान त्यांच्या वाहनाचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाट परिसरात आढळून आले. त्यामुळे या परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.

ताम्हिणी घाटातील दुर्गम आणि खोल दरीत शोध घेत असताना श्रीनिवास बेंडखळे यांची कार सुमारे १२०० फूट खोल दरीत कोसळल्याचे निदर्शनास आले. हा परिसर अत्यंत दुर्गम असल्याने बचावकार्य मोठे आव्हानात्मक होते. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन बचाव पथकांनी तातडीने शोध व बचावकार्य सुरू केले. सह्याद्रीच्या दुर्गम दरीतून मृतदेह बाहेर काढला. या कठीण बचावकार्यात सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था आणि शेलार मामा रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी मृतदेह पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ही दुर्घटना नेमकी कशी घडली, वाहनावरील नियंत्रण सुटण्यामागील कारण काय होते, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.