

रायगड : महाराष्ट्राच्या पर्यटन आणि पर्यावरण क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरणारी कोकण किनारपट्टी आता आंतरराष्ट्रीय नकाशावर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर, गुहागर, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार जाहीर झाला आहे. डेन्मार्क येथील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत पर्यावरणीय संवर्धन स्वच्छतेच्या आधारे हा बहुमान देण्यात आला आहे.
यामुळे कोकण किनारपट्टीच्या विकासासाठी वेगळा निधीही मिळू शकणार आहे. कोकणातील ज्या तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कठोर निकषांवर आधारित पुरस्कार मिळालेले आहेत, त्या किनाऱ्यांना उच्च दर्जाची स्वच्छता, समुद्राच्या पाण्याची उत्तम गुणवत्ता, सागरी जैवविविधतेचे उत्तम संवर्धन, पर्यटकांची सुरक्षा, आपत्कालीन व्यवस्थापन आणि शाश्वत व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या घटकांचा विचार करून हा पुरस्कार देण्यात आला आहे. या सर्व निकषांचे यशस्वी पालन केल्यामुळे या किनाऱ्यांचा दर्जा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.
जगात किनारी पर्यटनाला मोठी मागणी असून, गेल्या १० वर्षांमध्ये किनारी पर्यटन हे २५% ने वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या पर्यावरण, हवामान विभाग, पर्यटन विभाग यांनी या किनाऱ्यांच्या संवर्धनाचा निर्णय घेतला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांच्या समन्वयाने येथे नवे पर्याय उपलब्ध होणार आहेत.
यामध्ये मांडव्यापासून श्रीवर्धनपर्यंत असणाऱ्या या किनारपट्टीमध्ये मोठे पर्यटन वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, हरणेपासून राजापूरपर्यंतचे ११ किनारे हे पर्यटकांचे पसंतीचे किनारे आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातला संपूर्ण पर्यटन जिल्हा म्हणून १९९९ लाच घोषित झालेला जिल्हा आहे, त्यामुळे या जिल्ह्यालाही पर्यटनाची मोठी किनार आहे.
देवगड, मालवण, वेंगुर्ले या किनारपट्टी भागातील पर्यटन वाढावे यासाठी या जिल्ह्यातही विशेष प्रयत्न केले जात आहेत. या जिल्ह्यातील किनाऱ्यालाही यापूर्वीच हा पुरस्कार मिळालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग, निवती या किनाऱ्यांना पर्यटकांची अधिक पसंती आहे. तसेच स्वच्छ पाणी आणि बाकीच्या निकषांमध्येही हे किनारे अग्रस्थानी आहेत.
ब्ल्यू फ्लॅग पुरस्कारामुळे स्वच्छ, सुरक्षित, पर्यावरणपूरक सुरक्षित, पर्यावरणपूरक पर्यटनाला विशेष दर्जा प्राप्त होणार आहे. या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे जगभरातील पर्यटक येथे पोहोचू शकतील, असेही सांगितले जाते. हा पुरस्कार मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांना ३३ ठिकाणी निकष पूर्ण करावे लागणार आहेत.
प्राण्याची गुणवत्ता, समुद्रकिनाऱ्यावरील पाण्याची नियमित तपासणी, त्यात औद्योगिक किंवा सांडपाणी मिसळत नाही याची खात्री, पर्यावरण व्यवस्थापन, किनाऱ्यांना कचरा संकलन, पुनर्वापर, स्वच्छता आग्रहे आणि सागरी जैवविविधतेचे संवर्धन - हे निकष यापुढेही पूर्ण करावे लागतील। सुरक्षा आणि सुविधा, सुरक्षित जीवन रक्षक लाइफलाइन, प्रथमोपचार सुविधा, पिण्याचे शुद्ध पाणी, दिव्यांग पर्यटकांसाठी योग्य सोयीसुविधामहाराष्ट्रातील तीन समुद्रकिनाऱ्यांना पहिल्यांदाच हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.