

Raigad Zilla Parishad BJP Victory
पनवेल : जिल्हा परिषद रायगड व पनवेल पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रारंभीच्या कलांमध्ये भारतीय जनता पक्षाने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत जिल्हा परिषदेमधील ८ पैकी ५ जागांवर तसेच पंचायत समितीच्या १६ पैकी १० जागांवर भाजप उमेदवारांनी विजय संपादन करत आघाडी घेतली आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भाजप उमेदवारांनी अनेक गणांमध्ये निर्णायक आघाडी घेतल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजयाची मालिका सुरू होताच मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजीमुळे परिसरात निवडणूक विजयाचे वातावरण रंगले होते.
दरम्यान, जिल्हा परिषदेसाठी एकूण ८ जागांसाठी तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी ही निवडणूक पार पडली होती. त्यापैकी पाच जिल्हा परिषद जागांची मतमोजणी पूर्ण झाली असून सर्वच जागांवर भाजप उमेदवारांनी बाजी मारली आहे. त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या दहा गणांची मतमोजणी पूर्ण झाली असून या सर्व ठिकाणी भाजपने विजय संपादन करत पनवेल तालुक्यात आपले संघटनात्मक बळ पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
अद्याप जिल्हा परिषदेमधील ३ जागांची आणि पंचायत समितीच्या ६ गणांची मतमोजणी प्रक्रिया सुरू असून या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. उर्वरित जागांवरही भाजप आपले वर्चस्व कायम ठेवेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दुसरीकडे, या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (उबटा) यांना अद्याप खाते उघडता आलेले नाही. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच या पक्षांचे उमेदवार पिछाडीवर राहिल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पनवेल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ निकाल
१. वावंजे जिल्हा परिषद
कमला एकनाथ देशेंकर (भाजप ) ११५८४
लता धनराज म्हात्रे ( शेकाप ) १०५१६
नोटा : २९८
विजयी उमेदवार ( भाजप ) : कमला एकनाथ देशेंकर (भाजप ) ११५८४
आरती कुणाल काठे ( भाजप ) ५,०४३
पराग कचरू भोपी ( शेकाप ) ४९२६
आरती पाटील ( अपक्ष ) ६४
आकाश हरिश्चंद्र सांगडे ( अपक्ष ) १४५
शिवाजी महादू सांगडे ( अपक्ष ) ८०
नोटा : ९३
विजयी उमेदवार ( भाजप ) : आरती कुणाल काठे ( भाजप ) ५,०४३
खैर अंकुश बाळाराम ( भाजप ) ६५८९
बाळू गोमा गोवारी ( शेकाप ) ५०८०
योगेश नारायण पारधी ( अपक्ष ) २३९
नोटा : १३९
विजयी उमेदवार ( भाजप ) : खैर अंकुश बाळाराम
( भाजप ) ६५८९
भस्मा आत्माराम बाळू ( भाजप ) १५,३४३
मारुती बाळू भस्मा ( शेकाप ) ९,७४५
नोटा : ४२४
विजयी उमेदवार : भस्म आत्माराम बाळू ( १५,३४३ )
नेरे पंचायत समिती
केबारे वर्षा सचिन ( भाजप ) ७०३६
हेमा धर्मा वाघ ( शेकाप ) ४८३०
नोटा : २२०
विजयी उमेदवार : केवारे वर्षा सचिन ( भाजप ) ७०३६
भूपेंद्र सदानंद पाटील ( भाजप ) ८२६२
विलास नारायण फडके ( शेकाप ) ४९४९
नोटा ; २१५
विजयी उमेदवार : भूपेंद्र सदानंद पाटील ( भाजप ) ८२६२
प्राची अमित जाधव ( भाजप ) १३४६१
डॉ, ज्योती स्वप्नील भुजंग ( शेकाप ) ९२४१
नोटा : ४७२
विजयी उमेदवार भाजप : प्राची अमित जाधव ( भाजप ) १३४६१
वैशाली सावंत ( भाजप ) ५०२५
प्रज्ञा उबाळे ( शेकाप ) ३७९४
नीलम भोसले ( अपक्ष ) ३३६
प्रिया वाघमारे ( अपक्ष ) १०९
नोटा : २३७
विजयी उमेदवार ( भाजप ) : वैशाली सावंत ( कमळ ) ५०२५
नीलम भिंगारकर ( भाजप ) ७५६८
प्राची भिंगारकर ( शेकाप ) ५५६४
नोटा : २४०
विजयी उमेदवार ( भाजप ) नीलम भिंगारकर ( भाजप ) ७५६८
हर्षदा अतुल घरात ( भाजप ) १६०२४
अस्मिता अनिल ढवळे ( शेकाप ) ९१९५
नोटा ४०३
विजयी उमेदवार ( भाजप ) ; हर्षदा अतुल घरात
( भाजप ) १६०२४
संतोष खांडेकर ( शिवसेना शिंदे गट) ७१४
विक्रम घरत ( शिवसेना उबाटा गट ) ४६८९
राजेंद्र पाटील ( भाजप ) ८४६०
नोटा : २५०
विजयी उमेदवार ( भाजप ) : राजेंद्र पाटील ( भाजप ) ८४६०
योगिता लहाने ( भाजप ) ६२५६
शर्मिला माळी ( शेकाप ) ५१०४
नोटा १५०
विजयी उमेदवार ( भाजप ) योगिता लहाने ( भाजप ) ६२५६
अनन्या गाताडे ( भाजप ) १०८४६
अस्मिता माळी ( शेकाप ) ८९३३
नोटा २९६
विजयी उमेदवार ( भाजप )अनन्या गाताडे १०८४६
जनाबाई कोठावळे ( उबाटा ) ४५८८
करिष्मा थोरवे रेल्वे ( मनसे ) २३४
अस्मिता पाटील ( भाजप ) ५६३३
नोटा १९९
विजयी उमेदवार ( भाजप ) : अस्मिता पाटील ५६३३
राजू पाटील ( भाजप ) : ५७७२
मयूर ठाकूर ( शेकाप ) : ३४६८
नोटा : १८१
विजयी उमेदवार ( भाजप ) राजू पाटील ५७७२