Birds in  Raigad
पनवेलच्या बल्लाळेश्वर तलावातील पक्षी वैभव धोक्यातFile Photo

पनवेलच्या बल्लाळेश्वर तलावातील पक्षी वैभव धोक्यात

Published on

पनवेल, पुढारी वृत्तसेवा: पनवेलचा प्रसिद्ध बल्लाळेश्वर तलाव ५-६ वर्षांनी पुनः एकदा विविध रंगी पक्षांना आकर्षित करत आहे. त्यातच काही माहेरवास अनुभवायला आलेल्या (स्थानिक विण असणाऱ्या) पक्षांच्या विणीच्या हंगामात ह्याच पक्षांच्या खाद्य तसेच घरटी बनविण्यासाठी उपयोगी अशा कुमुदिनी पाणवनस्पती काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तलावातील पक्षी वैभव धोक्यात आले आहे.

पनवेल महानगरपालिका नको असलेली कामे करण्यात पुढे आहे. हे नागरिकांचे ठाम मत बनत चालले आहे. आत्ताच पनवेल उड्डाणपुलाच्या रंग रांगोटीवर लोकांनी आक्षेप घेतला असताना आता पक्षांच्या नैसर्गिक अधिवास नष्ट करण्याचा चंग बांधलेला दिसतो. येथील प्रसिद्ध बल्लाळेश्वर तलाव ५-६ वर्षांनी पुनः एकदा विविध रंगी पक्षांना आकर्षित करत आहे.

त्यातच काही माहेरवास अनुभवायला आलेल्या (स्थानिक विण असणाऱ्या) पक्षांच्या विणीच्या हंगामात ह्याच पक्षांच्या खाद्य तसेच घरटी बनवलाय उपयोगी अश्या कुमुदिनी ही पाणवनस्पती काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तलावातील पक्षी वैभव धोक्यात आले आहे. ह्यावरून पनवेल महानगरपालिका त्यांच्याकडे असलेल्या तज्ञसमितीचा सल्ला ऐकते का नाही, का तज्ञ समित्या फक्त नावाला आणि कागदावर दाखवण्या पुरत्याच तयार केल्या आहेत, असाही प्रश्न पर्यावरण प्रेमी नागरिकांनी उपस्थित केला.

हया पाण वनस्पती काढत असताना, जेव्हा पर्यावरण प्रेमींनी कंत्राटदाराच्या माणसाला विचारले की कुठल्या वनस्पति काढायच्या ह्याची माहिती आहे का? ह्यावर सदर कर्मचाऱ्याने त्याच्याकडे यादी नाही असे कबूल केले. लवकरात लवकर हे काम थांबवण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news