Independence Day 2026 : रायगडमध्ये गोगावले करणार ध्वजारोहण; तटकरे कोकणभवनात फडकवणार तिरंगा

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजकीय तिढा कायम
August 15 Flag Hoisting
मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरेpudhari photo
Published on
Updated on

रायगड : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवार १५ ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील दाेन्हीही मंत्री शासकीय ध्वजाराेहण करणार आहेत. रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ येथील अलिबागमधील पाेलिस मुख्यालयाच्या मैदानावर हाेणार आहे. राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजाराेहण हाेईल तर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते काेकणभवन येथे शासकीय ध्वजाराेहण हाेणार आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना यांच्यात माेठा राजकीय तिढा निर्माण झाला असल्याने रायगड आणि नाशिक या दाेन जिल्ह्यांचे पालकमंत्री अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. रायगडच्या पालकमंत्री भरत गाेगावले यांनाच मिळाले पाहीजे असा दावा शिवसेनेचा आहे तर रायगडच्या पालकमंत्री पदावर मंत्री आदिती तटकरे यांचाच हक्क असल्याचा दावा राष्ट्रवादी काॅंग्रेसचा हाेता.

August 15 Flag Hoisting
Walking for Diabetes : जेवल्यानंतरची १० मिनिटांची चाल ठरू शकते गेमचेंजर; मधुमेहींसाठी महत्त्वाची माहिती

दरम्यान विधानपरिषदेच्या काेकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील आमदारकीच्या जागेवर देखील शिवसेनेने दावा केला हाेता. मात्र या बाबत दाेन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वांच्या स्तरावर झालेल्या चर्चेनुसार ही जागा राष्ट्रवादी काॅंग्रेसला आणि रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला हाेता, असा दावा शिवसेनेचा असून त्याप्रमाणे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी विधानपरिषदेच्या या जागेकरिता आमदार म्हणून बिनविराेध निवड झाली असल्याने पालकमंत्रीपद मंत्री गाेगावले यांना देणार असा विश्वास शिवसेनेने अनेकदा व्यक्त केला आहे.

दस्तूरखुद्द मंत्री भरत गाेगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा वरिष्ठ पातळीवरील चर्चे अंती सुटला असल्याचे सांगितले आहे. काल (बुधवार) मंत्री गाेगावले यांनी रायगड जिल्हा पालकमंत्री मीच हाेणार असून त्याचा शासन आदेश आजच निघणे अपेक्षित असल्याचे माध्यमांशी बाेलताना सांगितले हाेते. त्याच वेळी रायगडमध्ये १५ आॅगस्ट राेजी मुख्य शासकीय ध्वजाराेहण मीच करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले हाेते. त्यापैकी रायगडचे शासकीय झेंडावंदन मंत्री गाेगावले यांच्या हस्ते हाेणार असल्याचा शासन पारित झाला आहे.

August 15 Flag Hoisting
Palghar Landslide Risk : पालघर जिल्ह्यातील अनेक ठिकाणे भूस्खलन, दरडीच्या छायेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news