Autumnal Equinox 2026: आज शरद विषुवदिन! पृथ्वीवर दिवस आणि रात्र असणार अगदी समान; जाणून घ्या या खगोलीय घटनेचे महत्त्व

२३ सप्टेंबरला सूर्य विषुववृत्तावर; पृथ्वीच्या अक्षीय कलामुळे घडते ही महत्त्वाची खगोलीय घटना
Autumnal Equinox 2026
Autumnal Equinox 2026Pudhari
Published on
Updated on

रायगड: आज, २३ सप्टेंबर २०२६ रोजी खगोलशास्त्र जगतात एक अत्यंत महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण घटना घडत आहे. आज पृथ्वीवर 'शरद विषुवदिन' (Autumnal Equinox) साजरा होत आहे.

या दिवशी निसर्गाच्या अद्भुत नियमांनुसार संपूर्ण जगभरात दिवस आणि रात्र प्रत्येकी १२-१२ तासांचे, म्हणजेच अगदी समान कालावधीचे असणार आहेत.

या खगोलशास्त्रीय घटनेमुळे आजचा दिवस निसर्गातील संतुलनाचा एक सुंदर संदेश मानला जातो अशी माहिती भूगोल अभ्यासक डॉ.समीर बुटाला यांनी दिली

या खगोलशास्त्रीय घडामोडीमागील मुख्य कारण म्हणजे पृथ्वीचा २४.५ अंशाने कललेला आस आणि तिची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा होय. आजच्या दिवशी सूर्य आपल्या आभासी भ्रमादरम्यान थेट पृथ्वीच्या विषुववृत्तावर (Equator) लंबरूप म्हणजेच ९० अंशाच्या कोनात चमकतो.

Autumnal Equinox 2026
Irrigation Well Subsidy: विहीर बांधली, खर्चही केला; पण सरकारी अनुदान कधी मिळणार? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

यामुळे उत्तर आणि दक्षिण या दोन्ही गोलार्धात सूर्यप्रकाशाचे अत्यंत समान वाटप होते. या दिवशी एक विशेष निसर्गदृश्य पाहायला मिळते, ते म्हणजे सूर्य तंतोतंत पूर्वेला उगवतो आणि सायंकाळी तंतोतंत पश्चिमेला मावळतो,असेही वैशिष्ठ्य डॉ.बुटाला यांनी सांगीतले.

विषुवदिनाचे वेधशास्त्रीय आणि हवामानशास्त्रीय दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे. आजच्या दिवसानंतर उत्तर गोलार्धात (ज्यात भारताचा समावेश होतो) शरद ऋतूला अधिकृत सुरुवात होत आहे. आता हळूहळू सूर्याचे दक्षिण गोलार्धाकडे प्रयाण सुरू होईल, ज्यामुळे उत्तर गोलार्धात दिवस लहान होत जातील आणि रात्री मोठ्या होत जातील.

Autumnal Equinox 2026
Khar Mhada Redevelopment: खारमधील म्हाडाच्या 56 वसाहतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, घरांचा आकारही वाढणार

यामुळेच हवामानात बदल होऊन थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात होईल. याउलट, दक्षिण गोलार्धात आजपासून वसंत ऋतूचे आगमन होत असून तिथे दिवस मोठे आणि रात्री लहान होण्याचा काळ सुरू होईल.वर्षभरातून केवळ दोनदाच अशी स्थिती निर्माण होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news