Panvel News: रेशनिंगचा तांदूळ परदेशात पाठवण्याचा डाव उधळला, रायगडमध्ये पोलिसांची कारवाई; रॅकेटचा पर्दाफाश होणार?

ट्रकमधील तांदूळ फॉर्टिफाईड असून अशा प्रकारचा तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) मधूनच वितरित केला जातो.
Fortified Rice
रेशनिंगचा Fortified तांदूळ परदेशात पाठवण्याचा प्रयत्न उधळला; ट्रकचालक-मालका विरोधात गुन्हा दाखलFile Photo
Published on
Updated on

Attempt to send rationing fortified rice abroad

पनवेल : विक्रम बाबर

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अर्थात (PDS) अंतर्गत असण्याची शक्यता असलेला फॉर्टिफाईड राइस (Fortified Rice) परदेशात पाठवण्याचा प्रयत्न पनवेल शहर पोलिस आणि पुरवठा अधिकारी पनवेल यांनी उधळला आहे. या कारवाईत पळस्पे येथील एका खासगी कंटेनर यार्डमधून तब्बल ३१९.७५ क्विंटल तांदूळ आणि ट्रॅक पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी ट्रकचालक आणि धान्य मालकाविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fortified Rice
Poladpur Encroachment | पोलादपूर बस स्थानकासमोरील अतिक्रमणावर हातोडा

ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे पुरवठा अधिकारी अश्विनी दानवे यांच्या पथकाने केली. सदर ट्रक परदेशी निर्यातीसाठी कंटेनर यार्डमध्ये पाठवण्यात आला होता. मात्र, तपासणीदरम्यान पोलिसांना लक्षात घेतले की, ट्रकमधील तांदूळ फॉर्टिफाईड असून अशा प्रकारचा तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) मधूनच वितरित केला जातो. त्यामुळे या धान्याचा वापर केवळ गोर गरीब आणि गरजूंसाठीच केला जाणे अपेक्षित असताना, त्याची निर्यात करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Fortified Rice
Raigad | शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचण्यात अडचणी; अधिकारी, कर्मचार्‍यांची 2.44 लाख पदे रिक्त

पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन सुमारे ३१९.७५ क्विंटल तांदळाची नोंद केली आहे. यासोबतच, ट्रकचा चालक व धान्याचा मालक कोण आहे, हे शोधून काढण्यात आले असून त्यांच्यावर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तांदळाचा प्रत्यक्ष वापर PDS साठी केला जात होता, की नाही, याची चौकशी सुरू आहे. मात्र, पोलिसांनी प्राथमिक तपासात असे नमूद केले आहे की, "या तांदळाचा PDS शी संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही."

फॉर्टिफाईड राइस म्हणजे काय?

फॉर्टिफाईड राइस हा अशा प्रकारचा तांदूळ असतो ज्यामध्ये अतिरिक्त पोषणतत्त्वे जसे की लोह, व्हिटॅमिन बी१२, फोलिक अ‍ॅसिड आदी मिसळलेले असतात. सरकारी योजनेअंतर्गत गरीब व गरजू कुटुंबांना याचा लाभ मिळावा यासाठी तो सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे वितरित केला जातो. अशा तांदळाचा खासगी वापर किंवा निर्यात करण्यास बंदी असते.

पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी अधिक तीव्र केली असून हे धान्य नेमके कोणत्या गोदामातून आले होते, कोणी याला निर्यातीसाठी पॅकिंग करून काेणी पाठवले, याचा सखोल तपास सुरू केला आहे. तसेच, या तांदळामागे एखादे रॅकेट कार्यरत आहे का, हेही तपासण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news