Gharapuri Island excavation | घारापुरी बेटाचा १५०० वर्षापूवीचा इतिहास ताजा; उत्‍खननात सापडले तिसर्‍या शतकातील समृद्‍ध बंदर

Raigad news | मुंबईपासून १० किमी. अंतरावर असलेल्‍या हे घारापूरी बेट संशोधकांसाठी एक नवा खजिणा सापडला आहे
Gharapuri Island excavation | घारापुरी बेटाचा १५०० वर्षापूवीचा इतिहास ताजा;  उत्‍खननात सापडले तिसर्‍या शतकातील समृद्‍ध बंदर
Published on
Updated on

ऋषिता तावडे

रायगड :  घारापूरीच्‍या उत्‍खननामध्‍ये १५०० वर्षापूर्वीचा इतिहस दृष्‍टिपथास आला आहे. इ.स.वी ३ ते इ.स.११ पर्यंत हे समृद्‍ध बंदर म्‍हणून अस्‍तित्त्‍वात हाेते याचे पुरावे उत्‍खननात सापडले आहेत.

तिसर्‍या आणि चौथ्‍या शतकापासून १२ व्‍या शतकापर्यंतचे पुरावे,सापडले आहेत. घारपूर बंदरावर मोठा व्‍यापार चालत असे पुरावे जुणे सापडलेली नाणी, भांडी आणि व्‍यापारी खुणा या बदंराचे महत्त्‍व पठवून देत आहेत. या बंदरावरून इराण, अरब राष्‍टे ते भारत असा व्‍यापार सुरू होता. असे सांगणारे पुरावे आणि त्‍याकाळीतली इराणी नाणी यात सापडली आहेत. या आंतरराष्‍ट्रीय बंदराचा वारसा जेएनपीए बंदराला मिळाला आहे. असे म्‍हणतात कि जूण्‍या  वारशातूनच नवीन काही निर्माण हाेते. याची प्रचिती पुर्वीची घारापूरी आणि समोर निर्माण झालेले जेएनपीए दिसून येत आहे.

Gharapuri Island excavation | घारापुरी बेटाचा १५०० वर्षापूवीचा इतिहास ताजा;  उत्‍खननात सापडले तिसर्‍या शतकातील समृद्‍ध बंदर
Gharapuri Bandar : घारापुरी बंदर ९०० वर्षे होते आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र

मुंबईपासून १० किमी. अंतरावर असलेल्‍या हे घारापूरी बेट संशोधकांसाठी एक नवा खजिणा सापडला आहे. या इतिहासामुळे मुंबईलाही आता नवा आयाम मिळाला आहे. येथील पुरातन लेण्‍यांमुळे या घारापूरी बेटाला ‘इनोस्‍कोने’ जागतिक वारसा स्‍थळाचा दिला आहे. यामुळे हे बेट आणखीणच चर्चेत आहे. येथील या लेण्‍या सहाव्‍या ते सातव्‍या शतकात कोरल्‍या गेल्‍याचे दाखलेही सापडले आहेत. गेले आठ महिने या बेटाचा इतिहास शोधण्‍यासाठी उत्‍खनन सुरु आहे. एकेकाळी पश्‍चिम किनार्‍यावरील भारताचे घारापुरी हे आंतरराठ्‍यि केंद्र हाोते. असेही पुररावे सापडले आहेत. 

चालुक्‍य राजवटीत हे बंदर उभे राहील्‍याचे सांगितले जाते. दुसर्‍या बाजूला पुरातन काळातील राजे कृष्‍णराज यांच्‍याही कालखंडात येथे लेण्‍या काेरल्‍याचे सांगितले जात आहे. कृष्‍णराज हे मध्‍यप्रदशमधील बलवान राजे होते. चालुक्‍य राजवट ही भारतात बराच काळ होती या दोन्‍ही राजवटीतील नाणी सापडली आहेत. घारापुरीचे उत्‍खनन हे जुणा वारसा सांगणारे पुरातन वारसा सांगणारे केंद्र ठरले आहे. २०२५ च्‍या नोव्‍हेंबर पासून भारतीय पुरातत्त्‍व विभाग आणि डेक्‍कन कॉलेज यांनी संयुक्‍तपणे उत्‍खनन सुरु आहे. हे उत्‍खनन खोरा बंदर परिसरात सुुरू आहे. 

Gharapuri Island excavation | घारापुरी बेटाचा १५०० वर्षापूवीचा इतिहास ताजा;  उत्‍खननात सापडले तिसर्‍या शतकातील समृद्‍ध बंदर
Mamata Banerjee Political Career: आव्हानांच्या गर्तेत ममतादीदी

बेटावर गोड्यापाण्‍यासाठी खाेदलेली पुरातन साठवणयोजना पाणी टाकी सापडली आहे. त्‍याच प्रमाणेच गाडली गेलेली अनेक दस्‍तऐवज, चांदीची नाणी येथे सापडली आहेत. हे शासकीय पद्‍धतीने उत्‍खनन सुरु आहे. येथे भांड्याचे तेरा कोटाचे अवेशेश सापडले आहेत. तसेच मातीची पाणी साठवण भांडी येथे सापडली आहे. आता येथील पुरातन भांडी संग्रहालयात ठेवली जाणार आहेत. हा जुणा इतिहास सर्वांसमोर मांडला जाणार आहे. पाणी साठवण योजनेल बारव असे जुणे नाव होते. खार्‍या पाण्‍याच्‍या प्रदेशात गोडे फ्रेश पाणी मिळाव म्‍हणून त्‍याकाळत योजना केली होती. येथे वापरण्‍यात येणार दगड हा लांब कोसावरून आणून तो लावण्‍यात आला आहे. हे सर्व यंत्रणा त्‍यावेळच्‍या आंतरराष्‍ट्रीय बंदरात लावण्‍यात आली आहे. येथे सापडलेल्‍या नाण्‍यांचा शोध घेतल्‍यानंतर तर हा जुणा इतिहास समोर पुढे आला आहे. येथे सापडलेल्‍या चांदीच्‍या नाण्‍यातून राजाचा चेहरा पहायला मिळतो. 

त्‍याकाळी शत्रक आणि महाशत्रक हे राजे होते. नाणी पाडताना याचा उल्‍लेख करण्‍यात आला आहे. यातून राजा शत्रकुच असा उल्‍लेख आहे. या नाण्‍यामध्‍ये शत्रक ते महाशत्रकचा इतिहास पहायला मिळते. त्‍याकाळात या राजांचे राजवट इथे होती असे म्‍हणता येते. या.शिवाय या बेटावर इराणच्‍या ससेनियन राजाची नाणी सापडली आहे. त्‍यामुळे इराण ते भारत असा व्‍यापार होत होता हे सिद्‍ध होते. त्रीकुट आणि कलचुरी या राजांचाही अंमल या आंतरराष्‍्रीय बंदरावर असल्‍याचे नाण्‍यांच्‍या संशोधनातून पुढे येते.

Gharapuri Island excavation | घारापुरी बेटाचा १५०० वर्षापूवीचा इतिहास ताजा;  उत्‍खननात सापडले तिसर्‍या शतकातील समृद्‍ध बंदर
Calcutta HC : "माझे मोठे भाऊ भाजपचे प्रवक्ते..."; ममता बॅनर्जींच्या याचिकेवरील सुनावणीपूर्वी न्यायमूर्तींनी केला खुलासा

हे सर्व राजे तिसरे शतक ते आठवे शतक या कालवधीत कार्यरत होते.  या कल्‍चूरी राज्‍यामध्‍ये कृष्‍णराज राजा पराक्रमी झाल्‍यााचे  आपण इतिहासात वाचतो. या राजाचेही या बंदरावर साम्राज्‍य होते. नाण्‍यांबराेबरच आणखी एक पुरातत्त्‍वीय पुरावा म्‍हणजे येथे सापडलेली भांडी. या भांड्यांचे आकार आणि स्‍वरूप पाहता इराणमधून आलेली भांडी असावीत. असा अंदाज आहे. या भांड्यांवरून आखातीप्रदेशातू येथे व्‍यापार चालत होता हे स्‍पष्‍ट होत आहे. 

याशिवाय या बंदरातून रायगड रोहापर्यंत आणि ठाणे वसईपर्यंत जलवाहतुक होत होती. याचा उल्‍लेखही पुरातन इतिहासात आहे. त्‍यामुळे तिसरे शतके ते अकरावे शतक अशा सातशे वर्षामध्‍ये एलिफंटा ते घरापूरी हे बंदराला व्‍यापारी बंदर म्‍हणून ओळख हाेती. याचे भक्‍कम पुरावे उत्‍खननात सापडले आहेत. येथे काही पुरातन मनी सापडले आहेत. हे पुरातन दागिण्‍यात वापरलेले मनी आहेत. आणि याचे कनेक्‍शन आखाती देशांशी आहे. आणि त्‍यावेळी व्‍यापाराची देवाणघेवाण वस्‍तूरुपाने होत होती. असे सांगणारे हे पुरावे आहेत.

Gharapuri Island excavation | घारापुरी बेटाचा १५०० वर्षापूवीचा इतिहास ताजा;  उत्‍खननात सापडले तिसर्‍या शतकातील समृद्‍ध बंदर
Mamata Banerjee | ममता बॅनर्जींना मोठा धक्का! विधानसभा अध्यक्षांनी ऋतब्रत बॅनर्जींना दिली विरोधी पक्षनेतेपदाची मान्यता

अलीकडील उत्खननात काय सापडले आहे ?

पुरातत्त्वशास्त्रज्ञांना 'इंडो-मेडिटेरेनियन' (रोमन) विशिष्ट भांड्याचे तुकडे, तसेच इतर आयात केलेली मातीची भांडी आणि काच सापडली आहेत. यावरून दोन लांबच्या प्रदेशांतील देवाणघेवाण समोर येते. घारापुरी हे एक धार्मिक स्थळ नव्हते, तर ते सागरी मार्गावरील व्यापक जाळ्यांमधील एक केंद्र होते. येथील उत्खननात आयात केलेली मातीची भांडीदेखील सापडली आहेत, तसेच काही नाणी सापडली असून यात तांब्याची आणि शिशाची आहेत. तांब्याच्या नाण्यांपैकी दोन नाणी ही कलचुरी राजवंशातील 'कृष्णराज' यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news