Alibag Rabi Crop Cultivation: अलिबागमध्ये रब्बी लागवडीला पावसाचा फटका; क्षेत्रात ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता

सप्टेंबर-ऑक्टोबरमधील पावसाच्या खंडामुळे जमिनीतील ओलावा कमी; भाजीपाला आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट
Alibag Rabi Crop Cultivation
Alibag Rabi Crop CultivationPudhari
Published on: 
Updated on: 

अलिबाग: पावसाच्या अनियमिततेचा फटका आता अलिबाग तालुक्यातील रब्बी हंगामातील शेतीला बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तालुक्यातील रब्बी लागवड क्षेत्र ४० टक्क्यांपर्यंत घटन्याची शक्यता आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत पावसाने घेतलेल्या अनपेक्षित विश्रांतीमुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून, यंदा रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रात तब्बल ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भाजीपाला आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

Alibag Rabi Crop Cultivation
Raigad Mango Cashew Production: पोषक थंडीमुळे रायगडमध्ये आंबा-काजू पिक बहरणार; बागायतदारांच्या आशा पल्लवित

अलिबाग तालुक्यात मागील रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. यामध्ये तोंडली पिकाखाली २२२.५० हेक्टर, पांढऱ्या कांद्याखाली ३१६.३० हेक्टर, तर इतर भाजीपाला पिकांखाली ५६४.२९ हेक्टर क्षेत्र होते. त्याचप्रमाणे वाल पिकाची ६३० हेक्टरवर, तर हरभरा व इतर कडधान्यांची मिळून ३८४.१० हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली होती.

मात्र, यंदाच्या २०२६-२७ या रब्बी हंगामात परिस्थिती बदलली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांतील पावसाचा खंड, पावसाचे असमान वितरण आणि जमिनीतील कमी झालेला ओलावा यामुळे पेरणी आणि लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Alibag Rabi Crop Cultivation
Karjat Torrent Project Protest: कर्जतमध्ये टोरंटच्या प्रकल्पांविरोधात कॅण्डल मार्च; ३२ संघटना एकवटल्या

परिणामी, तोंडली, पांढरा कांदा, विविध भाजीपाला, वाल आणि हरभरा या पिकांच्या लागवड क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी आवश्यक असणारा जमिनीतील ओलावा आणि सिंचनासाठी उपलब्ध असलेले पाणी यांचा विचार करून शेतकरी लागवडीचे निर्णय घेत आहेत.

कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड, ठिबक सिंचनाचा वापर आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले जात आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामाकडून अपेक्षा ठेवणाऱ्या अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित यंदा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.