

अलिबाग : नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात अलिबाग शहरात भाजप आणि शेकाप यांच्यात दुरंगी लढतीचे सुस्पष्ट चित्र दिसू लागले आहे. प्रभागनिहाय उमेदवारांच्या अर्जांचा आढावा घेतला असता दोन्ही पक्षांनी रणनीतीपूर्वक उमेदवारांची फौज उभी केल्याचे दिसते.
प्रभाग 1 ‘अ’ मधून यश पालवणकर (शिवसेना) तर 1 ‘ब’ मधून रिद्धी मांजरेकर (भाजप) यांनी अर्ज दाखल केला. प्रभाग 2 ‘अ’ मध्ये सुजाता इंगळे (भाजप) आणि 2 ‘ब’ मध्ये संतोष साळुंखे (भाजप) हे भाजपचे दोन उमेदवार रिंगणात आहेत.
प्रभाग 3 ‘अ’ मधून भक्ती वारगे (भाजप) तर 3 ‘ब’ मधून रंजीत शिंदे (शिवसेना) यांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग 4 ‘अ’ मध्ये विजया पार्सेकर (भाजप) तर 4 ‘ब’ मध्ये कृष्णनाथ चाळके (भाजप) हे दोन्ही उमेदवार पुन्हा भाजपचेच आहेत. प्रभाग 5 ‘अ’ मधून अमिता सोनवणे (भाजप), 5 ‘ब’ मधून राजेश प्रधान (भाजप) तसेच प्रभागांतील अतिरिक्त जागेवरून देवेन सोनवणे (भाजप) यांनी कागदपत्रे दाखल केली.
प्रभाग 6 ‘अ’ मध्ये पल्लवी जोशी (भाजप) तर 6 ‘ब’ मध्ये विकास कर्णेकर (शिवसेना) यांनी अर्ज दाखल केला असून या प्रभागात दोन्ही पक्षांमध्ये चुरस दिसणार आहे. प्रभाग 7 ‘अ’ मधून नईमा घट्टे (भाजप) आणि 7 ‘ब’ मधून ऍड. अंकित बंगेरा (भाजप) हे भाजपचे वर्चस्व दर्शवणारे उमेदवार मैदानात आहेत.
प्रभाग 8 ‘अ’ मध्ये रईसा अक्तर (भाजप), तर 8 ‘ब’ मधून अश्रफ घट्टे (शिवसेना) यांनी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग 9 ‘अ’ मधून वैजयंती पाटील (भाजप) तर 9 ‘ब’ मधून मनीष पेरेकर (शिवसेना) असे दुरंगी रिंगण दिसत आहे. प्रभाग 10 ‘अ’ मधून प्रवीण भगत आणि दत्तात्रेय तांडेल (भाजप) तर 10 ‘ब’ मधून विजेता सारंग (भाजप) यांनी आपली उमेदवारी नोंदवली.
अलिबाग शहरात शेकाप आणि भाजप यांच्यात थेट सामना रंगणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. भाजपची जोरदार उपस्थिती असून काही प्रमुख प्रभागांत शिवसेना कडवी टक्कर देताना दिसत आहे.