

रायगड : अलिबाग नगरपरिषदेच्या 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्षाचे 3 सदस्य निवडून आले आहेत. यापैकी शिवसेना (उ.बा.ठा.) कडून 2 आणि भाजपाकडून 1 सदस्य निर्वाचित झाला आहे.
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संदीप जनार्दन पालकर यांना विरोधी पक्ष नेते म्हणून घोषित केले असून, नगरसेविका ॲड. श्वेता संदीप पालकर यांनी मुख्याधिकारी कार्यालयाकडे पत्र पाठवून विरोधी पक्षासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करण्याची विनंती केली आहे.
महाराष्ट्र नगरपालिका कायदा, 1949 आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमांनुसार दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष किंवा गट अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळवू शकतो, ज्यासाठी किमान 10 टक्के जागा आवश्यक आहेत. नगरपरिषदेतील विरोधी पक्षाला स्वतंत्र दालन मिळेल की नाही, यावर सध्या प्रशासनाचा निर्णय अपेक्षित आहे.