Alibag municipal election: अलिबागमध्ये महायुतीतर्फे तनुजा पेरेकर रिंगणात

भाजप, शिवसेनेतर्फे शक्तिप्रदर्शन, दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचीही उपस्थिती
Alibag municipal election
अलिबागमध्ये महायुतीतर्फे तनुजा पेरेकर रिंगणातछाया ः रमेश कांबळे
Published on
Updated on

अलिबाग ः अलिबाग नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप व शिवसेना युतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी (दि.17) उमेदवारी अर्ज दाखल केले. युतीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या तनुजा पेरेकर यांनी अर्ज दाखल केला.

सोमवारी भाजप व शिवसेना युतीचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने सकाळपासून अलिबाग येथील भाजप कार्यालयात कार्यकर्ते तसेच उमेदवार दाखल होऊ लागले होते. आम. विक्रांत पाटील, आमदार महेंद्र दळवी, भाजपचे नेते सतीश धारप हे भाजप कार्यालयात आल्यानंतर जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवार अर्ज भरण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेत दाखल झाले. यांनतर निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम पाटील यांच्याकडे उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

Alibag municipal election
Raigad fraud case: कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला 10 लाखांचा गंडा

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. अस्वाद पाटील, भाजप महिला आघाडी जिल्हा संघटिका चित्रा पाटील, भाजप जिल्हा चिटणीस ड. महेश मोहिते, भाजप अलिबाग शहराध्यक्ष ॲड. अंकित बंगेरा यांच्यासह भाजप व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Alibag municipal election
Bharat Gogawale: सुनील तटकरेंनी महाडसाठी काय केले; गोगावलेंचा रोखठोक सवाल

जनतेला बदल हवा आहे. यामुळे भाजप, शिवसेना युतीच्या उमेदवारांना त्यांचा पाठिंबा मिळत आहे. अलिबाग नगरपरिषदेत मागील काही वर्ष विरोधकांची सत्ता आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात येथे विकास झालेला नाही. येथे विकासाची गंगा आणण्यासाठी जनता युतीच्या पाठी उभी राहून, युतीच्या उमेदवारांना विजयी करेल.

विक्रांत पाटील, आमदारी

समन्वयाने आम्ही अलिबाग नगरपरिषदेत जागा वाटप केले आहे. भाजपची शहरातील ताकद पाहता त्यांच्याकडे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली. तनुजा पेरेकर यांनी युतीतर्फे नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला आहे. मी नगरपरिषदेच्या विकासासाठी मोठा निधी आणला आहे. यामुळे नगरपरिषदेत निश्चित परिवर्तन होईल.

महेंद्र दळवी, आमदार- विक्रांत पाटील, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news