Bharat Gogawale: सुनील तटकरेंनी महाडसाठी काय केले; गोगावलेंचा रोखठोक सवाल

Mahad Nagarparishad Election 2025: महाड नगर परिषदेमध्ये परिवर्तन अटळ : गोगावले
Mahad Municipal Council Election
महाड नगर परिषदेमध्ये परिवर्तन अटळ : गोगावले छाया : प्रीतम सकपाळ
Published on
Updated on

महाड : यंदाच्या निवडणुकीत महाड नगरपरिषदेमध्ये परिवर्तन अटळ असून,दोन टर्म रायगडचे खासदार असणाऱ्या सुनील तटकरे यांनी महाडसाठी काय केले,असा रोखठोक सवाल रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महाड येथे विचारला आहे. नगरपालिकेसाठी सोमवारी अखेरच्या दिवशी शिवसेनेच्यावतीने शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले.यावेळी उपस्थितांसमोर ते बोलत होते.

महाड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास महाडची गावदेवी जाकमाता मंदिराचे दर्शन घेऊन मंत्री भरत शेठ गोगावले, युवा नेते विकास गोगावले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नगरपरिषद प्रशासकीय भवनाकडे महाड शहरातील मुख्य बाजारपेठेतून नागरिक व्यापारी बांधवांची भेट घेत प्रस्थान केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत नगराध्यक्ष पदास उमेदवार माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर, जिल्हा प्रवक्ते नितीन पावले व नगर परिषदेचे सर्व 20 उमेदवार तालुका व शहरातील विविध प्रमुख पदाधिकारी व हजारो शिवसैनिक माता-भगिनी उपस्थित होत्या.

Mahad Municipal Council Election
Badlapur Municipal election : बदलापुरात भाजपाच्या उमेदवार यादीवर कपिल पाटील समर्थकांची गच्छंती

दुपारी दीड ते सुमारास महाड नगर परिषदेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाडचे तहसीलदार महेश शितोळे व मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्षपदाचा अर्ज सुनील कवीसकर यांनी सादर केला. यावेळी युवा नेते विकास गोगावले जिल्हा प्रवक्ते नितीन पावले आरपीआयचे मोहन खांबे आधी मान्यवर उपस्थित होते.

निवडणुकीचा अर्ज भरून झाल्यावर प्रशासकीय भवनाच्या बाहेरील आवारात पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री भरत शेठ गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांनी महाडच्या विकासकामा संदर्भात दुर्बिण व चष्मा लावून पहावे लागेल अशा शब्दात केलेल्या टीकात्मक बाबीचा जोरदार समाचार घेऊन मागील दोन टर्म पासून रायगडचे खासदार म्हणून काम करणाऱ्या सुनील तटकरे यांनी महाड शहराकरता काय केले असा रोखठोक सवाल केला .

महाड शहरातील नागरिकांच्या असलेल्या गरजा लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहरांतील 2021 च्या महापुरानंतर नदीपात्रातील गाळ काढणे कामी 21 कोटींचा निधी खर्च झाला असून आगामी काळात वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे निदर्शनास आणले.

Mahad Municipal Council Election
Dombivli air pollution : डोंबिवलीच्या ऑक्सिजन झोनमध्ये दुर्गंधीचा प्रसार

आपण प्रस्तावित केलेल्या विकासकामांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभिकरण, वीरेश्वर तलाव ,हापूस तलाव ,कोटेश्वरी तलाव यांचे नूतनीकरण, सायली गार्डन येथील बगीचा, याशिवाय कोर्टाची इमारत, प्रशासकी इमारत, भाजी मंडई इमारत आदी इमारतींचा समावेश असल्याचे सांगून खासदार तटकरे यांनी एक दिवस मैफल मध्ये बसून या संदर्भातील वस्तूचा पहावी असा सल्ला दिला.

यावेळी युवा नेते विकास गोगावले यांनी विरोधकांकडून होणाऱ्या टिकेचा जोरदार समाचार घेताना मागील 25 वर्षे सत्ता कोणाची होती? अशी विचारणा केली. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री असताना महाड करता दिलेल्या वैविध्यपूर्ण योजनेतून महाडमधील कामे सुरू असून या विकास कामांना घेऊनच आपण जाणार असून आता महाडची जनताच या विकास कामांच्या आधारे आम्हाला विजयी करेल व जनता जनार्दनच महाडचा नगराध्यक्ष व नगरसेवक कोण असेल याचा निर्णय घेईल असा विश्वास व्यक्त केला.

मागील साडेतीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये झालेली कामेच विकास कामे असून हीच कामे महाडकरांसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. शिवसेनेच्या रॅलीत ध्ये महिलांची संख्या लक्षणीय नागरिकांमध्ये राष्ट्रवादी, भाजप युती आणि सोमवारी शिवसेनेच्या रॅलीची तुलना शहरात सुरू होती. अधिक संख्येने कोणत्या रॅलीमध्ये जनता समाविष्ट होती याबाबत खुमासदार चर्चा ऐकू येत होती.

विकासकामे काळा गॉगल लावून पहावीत

रायगडची दुसऱ्यांदा लोकसभेची टर्म सुरू असणाऱ्या खासदार सुनील तटकरे यांनी महाडसाठी काय केले आहे महाड शहराच्या गरजा म्हणून 300 ते साडेतीनशे कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित केल्याचे स्पष्ट करून ही कामे पाहण्यासाठी त्यांनी काळा गॉगल लावून रात्री यावे असा टोला लगावला. तटकरे काळा गॉगल लावतात त्यामुळे त्यांना आतमध्ये काय दिसते हे माहिती नाही. मात्र महाडकरता 65 कोटी रुपयांची नळपाणी योजना, डीपी अंतर्गत 94 कोटी रुपयांचे रस्ते, 50 कोटी रुपयांच्या भूमिगत विद्युत वाहिनीची कामे , 120 कोटी रुपयांची मलनिस्सारण योजना याशिवाय अंतर्गत रस्ते गटारे यांचा समावेश असल्याचे निदर्शनास आणले.

महाडची जनता सुजाण असून यावर्षी नगर परिषदेमध्ये महाडची जनता दूध का दूध पानी का पानी करून येथील परिवर्तन अटळ असून, नगर परिषदेवर कोणत्याही परिस्थितीत भगवा फडकविणारच असा निर्धार व्यक्त केला. खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये महाड करता केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर सादर करा.

ना.भरतशेठ गोगावले, मंत्री रोहयो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news