Alibag Kolivada Social Boycott Case : अलिबाग कोळीवाडा येथे कुटुंबाला वाळीत टाकल्याची तक्रार

कुटुंबप्रमुख गणेश बंद्री यांचे पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदर सादर
अलिबाग (रायगड)
अलिबाग येथे कुटुंब अनेक वर्षांपासून मच्छीमार जेट्टी येथे मच्छी व्यवसाय करीत असून त्यांना वाळीत टाकण्यात आले.Pudhari News Network
Published on
Updated on

अलिबाग (रायगड) : रमेश कांबळे

एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकत त्या कुटुंबाला बहिष्कृत करणे हे चुकीचे असतानासुद्धा अलिबाग शहरातील कोळीवाडा येथे विशाल हरिश्चंद्र बना, प्रदोष गोरक्षनाथ तांडेल,धीरज भगत, केतन भगत, कुणाल जनार्दन पोरे,अनिल भगत, दिनेश भगत, सागर शिवनाथ भगत, अनिकेत डबरी, अश्विन डबरी अर्थव मुजावर,रणजीत खमिस, (सर्व रा. बंदरपाडा, कोळीवाडा अलिबाग) आदींनी गणेश सत्यवान बंद्री यांच्या वाळीत टाकून कुटुंबाला एकाकी टाकल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे निवेदन सादर करीत न्याय मागण्याची मागणी केली आहे.

गणेश बंद्री यांनी पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तक्रारदार बंद्री कुटुंबाचा मच्छिमारी व मच्छीविक्री हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय व उपजीविकेचा साधन असून समाजामध्ये चांगले नावलौकिक आहे. सदर कुटुंब अनेक वर्षांपासून अलिबाग मच्छीमार जेट्टी येथे मच्छी व्यवसाय करीत आहेत. सत्यवान बंद्री यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील रॉकी डिसुझा यांचेकडून मच्छिमारी बोट सन 2024 साली खरेदी केलेली असून सदर बोट घेताना सत्यवान बंद्री व त्यांची पत्नी हर्षदा गणेश बंद्री यांनी बँक ऑफ बडोदा, शाखा चेंढरे या बँकेकडून अक्षरी पंच्याहत्तर लाख रुपये कर्ज तसेच अन्य ठिकाणाहून उसनवारी सत्तावीस लाख अशी एकूण रुपये कोटी दोन लाख कर्ज घेतलेले आहे.

image-fallback
कुटुंबांना समाज बहिष्कृत केल्याची तक्रार पोलिसांकडून बेदखल!

अलिबाग येथील समुद्र किनारी असलेल्या जून्या मच्छीमार जेट्टी लगत सार्वजनिक सरकारी जागेत भराव करून स्थानिक आमदार, नगरसेवक व अन्य पुढार्‍यांचा आर्थिक सहाय्याने नविन जेट्टी बांधलेली आहे. त्यामुळे ज्यावेळी सत्यवान यांना बोट घेतली, त्यावेळी अलिबाग मच्छीमार अध्यक्ष विशाल हरिश्चंद्र बना, व पंच प्रदोष गोरक्षनाथ तांडेल, तसेच त्यांचे अन्य अन्य सहकारी यांना कळविले. त्यावेळेस त्यांनी सत्यवान यांनी बोट नविन जेट्टी येथे लावण्यास परवानगी दिली. त्यावेळेस सत्यवान यांनी सर्वांनप्रमाणे वर्गणी म्हणुन रक्कम रुपये 1,75,000/- प्रदोष गोरक्षनाथ तांडेल यांचेकडे रोख स्वरूपात जमा केले होते.. त्याची कबुली त्यांनी व्हॉट्सप वरील मच्छीमार ग्रुप मध्ये दिली होती.

अलिबाग (रायगड)
Raigad Crime News | मुरुडमधून 13 लाख 61 हजारांचे चरस जप्त

त्यानंतर काही दिवसांनी विशाल हरिश्चंद्र बना हे मच्छीमार सोसायटीतून रक्कम रुपये 2,00,000/- तसेच 3,00,000/- लाखाचा डिझेल उधार घेतात, म्हणुन सत्यवान बंदरी यांनी त्यांना त्याबाबतीत त्यांना विचारणा केली, त्यावेळेस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यां त्या गोष्टीचा मनात राग ठेवला व सोसायटीचा तसेच गावातील अन्य सर्व मंडळीचा मनात सत्यवान बंद्री बद्दल कानभरणी केली. विशाल हरिश्चंद्र बना, प्रदोष गोरक्षनाथ तांडेल,धीरज भगत, केतन भगत, कुणाल जनार्दन पोरे,अनिल भगत, दिनेश भगत, सागर शिवनाथ भगत, अनिकेत डबरी, अश्विन डबरी अर्थव मुजावर,रणजीत खमिस यांनी सत्यवान बंद्री यांची बोट नविन जेटीवर लाऊ नये. तसेच बंद्री यांच्यासोबत कुणीही कोणत्याही प्रकारचा संबंध ठेऊ नये. कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ नये किंवा कार्यक्रमात सहभागीघेऊ नये असे मीटिंग घेऊन बंदी यांना वाळीत टाकलेले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अलिबाग कोळीवाडा येथील रहिवाशी गणेश बंद्री यांनी दाखल केलेल्या निवेदनाची प्रत प्राप्त झालेली आहे. याबाबत तातडीने अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांना सूचना देत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आंचल दलाल, पोलीस अधीक्षक

मच्छीमारी बोट लावायलाही विरोध

सत्यवान बंद्री हे जेट्टीवर बोट लावायला गेलो. त्यावेळेस त्यांना सर्व जणांनी विरोध केला. तसेच बंद्री यांची पत्नी हर्षदा देखील तिथे मच्छी विक्री करण्यास विरोध केला. जेट्टीवर बोट लाऊन मच्छी घेणारे व्यापारी सोमनाथ तांडेल यांना मच्छी विक्री करिता काटा लावला असता वरील सर्व जण तिथे आले व त्यांनी वजनकाटा उडवून दिला तसेच सत्यवान बंद्री आणि त्यांची पत्नी हर्षदा व अश्लिल शिवीगाळ करीत इथे धंदा करून देऊ नका त्यांनी इथे धंदा केला तर यांना ठार मारू अशी शिवीगाळ करून धमकी दिली आहे असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news