Raigad Shrimp Farming : खारेपाटातील पारंपरिक कोळंबी शेती, नव्या आर्थिक क्रांतीची संधी

कायदेशीर अडचणीं दुरु करुन पायाभूत सुविधांची अपेक्षा
Raigad Shrimp Farming
Raigad Shrimp Farmingpudhari photo
Published on
Updated on

रायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागात निमखाऱ्या पाण्यातील पारंपरिक 'करपाल' (ब्लॅक टायगर) व 'पोचा' (सोंदल) कोंळबीचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी आर्थिक क्रांती घडवणारे आहे. सुमारे ५० टक्के नफा मिळवून देणारा हा व्यवसाय उत्तम 'कॅश क्रॉप' म्हणून उभा राहत असला, तरी पायाभूत सुविधा व कायदेशीर अडचणींमुळे सद्यस्थितीत संकटात सापडला आहे.

भातशेतीला व्यावसायिक मत्स्यशेतीचा पर्याय रासायनिक खतांचा बेसुमार वापर आणि मजुरांची तीव्र टंचाई यामुळे पारंपारिक भातशेती कठीण झाली आहे. यावर पर्याय म्हणून अलिबागच्या शहापूर-धेरंड परिसरात जिताडा व कोलंबी तलावांची संख्या ६५ वरून थेट २५० पर्यंत पोहोचली आहे.

Raigad Shrimp Farming
Fake Gold Brick Scam : सोन्याची वीट निघाली बनावट; २० लाख घेऊन भामटे पसार

उत्कृष्ट उत्पन्न आणि ॲग्रो-टुरिझमला वाव धाकटे शहापूर व मोठे शहापूर येथील शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगात अवघ्या ६ महिन्यांत कोलंबीचे वजन १०० ते २०० ग्रॅमपर्यंत वाढले. यातून शेतकऱ्यांना एकरी सरासरी २ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. याशिवाय, कोलंबीच्या अवयवांपासून बनवले जाणारे हाय-प्रोटीन व कॅल्शियमयुक्त 'सूप व मिसळ' पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरू शकते, ज्यामुळे ॲग्रो-टुरिझमलाही मोठा वाव आहे.

मत्स्य व्यावसायिकांपुढील प्रमुख आव्हाने कोकणात स्वतःची हॅचरी (मत्स्यबीज केंद्र) नसल्याने पाँडिचेरी, आंध्र प्रदेश व तमिळनाडूकडून किमान १ लाख नग खरेदी करावे लागतात. यामुळे लहान शेतकऱ्यांना बीज मिळणे कठीण होते. तलावांपर्यंत माल पोहोचवण्यासाठी पाणंद रस्ते नाहीत. मार्च महिन्यात पाण्याची क्षारता वाढल्यावर गोड्या पाण्याची अत्यंत गरज असते, मात्र ते न मिळाल्यास कोलंबी मरून नुकसान होते. 'खारभूमी अधिनियम १९७९' नुसार ७/१२ वर योग्य नोंदी नसल्याने तलावांना हक्काचे गोडे पाणी व अधिकृत मान्यता मिळत नाही.

Raigad Shrimp Farming
Independence Day 2026 : रायगडमध्ये गोगावले करणार ध्वजारोहण; तटकरे कोकणभवनात फडकवणार तिरंगा

शासकीय मदतीची व नीतीबदलाची आवश्यकता हा व्यवसाय वाचवण्यासाठी मत्स्य व्यवसाय खाते, कृषी विभाग व नाबार्डने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. कोकणातच कोलंबी हॅचरी उभारणे, शेतकरी गट तयार करणे आणि संपादित पडीक जमिनी मत्स्यतलावांसाठी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शासनाने ७/१२ वरील नोंदींचे प्रश्न तातडीने मार्गी लावल्यास स्थानिक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक उन्नती होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news