Alibag Diarrhea Outbreak : बोर्लीपंचतन परिसरात अतिसाराचे ३०८ रुग्ण

जि.प.च्या आरोग्य विभागाला खडबडून जाग; पथकामार्फत तत्काळ सर्वेक्षण सुरू
Alibag Diarrhea Outbreak
Alibag Diarrhea Outbreakpudhari photo
Published on: 
Updated on: 

अलिबाग : प्राथमिक आरोग्य केंद्र बोलीपंचतन अंतर्गत बोर्लीपंचतन गावामधील कोंडेपंचतन रोड, वांजळे रोड, चिंचबादेवी रोड, साईनगर, कुंभारआळी या परिसरात अतिसाराची लक्षणे असलेले ३०८ रुग्ण आढळून आहेत. यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून प्राथमिक आरोग्य केंद्र बोलींपंचतन येथील आरोग्य पथकामार्फत तत्काळ सर्वेक्षण करण्यात आले.

सर्वेक्षणामध्ये एकूण एक हजार १४२ घरांमध्ये तीन हजार १३० लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ८१ रुग्ण व आरोग्य पथकामार्फत घरोघरी केलेल्या सर्वेक्षणामध्ये २२७ असे एकूण ३०८ रुग्णसंख्या झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सर्व अतिसार बाधित रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यात आले आहेत.

Alibag Diarrhea Outbreak
Raigad Workers Protest : उरणमध्ये १११ कामगारांवर उपासमारीची वेळ

बोर्लीपंचतन गावामधील कोंडेपंचतन रोड, वांजळे रोड, चिंचबादेवी रोड, साईनगर, कुंभारआळी या परिसरात काही नागरिकांना जुलाब, पोटात दुखणे अशी अतिसराची लक्षणे आढळून आली आहेत. त्या पाश्र्वभूमिवर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने तातडीने या भागात घरोघरी जाउन सर्वेक्षण केले.

प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सर्व अतिसार बाधित रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत सर्व रुग्णांची प्रकृती बरी आहे. एकही रुग्ण अॅडमीट झालेला नसून एकही रुग्ण गंभीर नाही. अद्यापर्यंत कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती देण्यात आली.

पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करणार

गावातील पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने जैविक व रासायनिक तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळा अलिबाग येथे पाठविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत अतिसाराची साथ आटोक्यात असून परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता जुलाब अतिसार व पोटात दुखणे अशी लक्षणे आढळून आल्यास उपचारासाठी त्वरीत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यावे. स्वच्छतेचे पालन करावे असे आवाहन रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.