Rare fish found: अंबा नदीत आढळला दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार' मासा

'गार' प्रजातीचे मासा टोकदार तोंड, मगरीसारख्या जबड्यासाठी ओळखला जातो
Rare fish found
Rare fish foundPudhari
Published on
Updated on

संतोष उतेकर

सुधागड: सुधागड तालुक्यातील वावे गावाजवळून वाहणाऱ्या अंबा नदीच्या पात्रात एक अत्यंत दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण मासा आढळून आला आहे. या परदेशी प्रजातीच्या माश्याचे नाव 'अल्बिनो एलीगेटर गार' असून तो चमकदार पिवळ्या आणि नारंगी रंगाचा आहे.

सकाळी वावे येथील स्थानिक तरुण कैलास हिलम आणि केतन म्हसके हे नेहमीप्रमाणे नदीकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान त्यांना नदीपात्रात हा आकर्षक रंगाचा मासा मृत अवस्थेत पडलेला दिसून आला. नदीत असा अनोखा जीव पाहताच परिसरात याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Rare fish found
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बाह्यमार्ग गणेशोत्सवापूर्वी होणार खुला

निसर्गातील अशा दुर्मिळ जनुकीय बदलाची (अल्बिनो अवस्था) ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. नुकताच माणगाव शहरात अतिवृष्टीमुळे जमिनीबाहेर पडलेला पांढऱ्याशुभ्र रंगाचा अत्यंत दुर्मिळ 'अल्बिनो चंचु वाळा' हा बिनविषारी साप आढळून आला होता. त्या सापाप्रमाणेच या माशाच्या शरीरातील नैसर्गिक रंगद्रव्ये नष्ट झाल्याने त्याला हा अनोखा रंग प्राप्त झाला आहे.

वन्यजीव अभ्यासक सागर दहिंबेकर यांनी सांगितले की 'गार' प्रजातीचे मासे त्यांच्या टोकदार तोंडासाठी आणि मगरीसारख्या दिसणाऱ्या जबड्यासाठी ओळखले जातात.

निसर्गामध्ये या माशांचा मूळ रंग गडद किंवा राखाडी असतो. परंतु, जनुकीय बदलांमुळे या विशिष्ट माशाचा रंग पूर्णपणे पांढरा किंवा चमकदार पिवळा-नारंगी झाला आहे.

Rare fish found
Shrivardhan Rice Farming Loss: श्रीवर्धनमधील भातशेती संकटात! पावसाचा दुहेरी फटका; प्रशासनाच्या मदतीची प्रतीक्षा

पुरामुळे कोणाच्यातरी फिश टॅंक मधून किंवा कोणीतरी तलावा मध्ये सोडला असेल पुराचे पाणी आत गेल्याने तो बाहेर नदीपात्रामध्ये आला असेल किंवा कोणीतरी सोडला असेल.

ही प्रजाती मूळची भारतातील नसून ती उत्तर अमेरिका आणि ब्राझीलमधील नद्यांमध्ये आढळतो. हा मासा अत्यंत झपाट्याने वाढतो. येथील नदी व तलावतील माशांसाठी तो घातक आहे. त्वचारोग झाल्याने त्याची त्वचा अशी दिसते. हा आजार दुर्मिळ आहे आणि अशाप्रकारे आजार असलेला मासा फार दिवस मोकळ्या पर्यावरणात राहू शकत नाही. कारण त्याला इतर प्राण्यांपासून धोका असतो. सदर मासा हा कोणीतरी फिश टॅंक मध्ये पाळण्यासाठी आणला असावा आणि त्यानंतर त्याला सांभाळणे शक्य न झाल्यामुळे नदीमध्ये सोडला असावा.

- नितीन निकम, मत्सतज्ञ, पेण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news