

अतुल गुळवणी, रायगड
खेळ ऐन रंगात आलाय, विजय समिप दिसतोय असं वाटतं असतानाच संघाचा कर्णधार जर मैदानावरून कायमस्वरूपी बाद व्हावा आणि सर्व डाव अर्ध्यावरच मोडावा... अशी वाईट परिस्थिती बुधवारी महाराष्ट्राची झाली. एका दुर्दैवी विमान अपघातात कर्मभूमी असलेल्या बारामतीत राज्याचे कर्तबगार, धडाडीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकाली निधन झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उमदे व्यक्तिमत्व अजितदादा पवार हे आयुष्याचा डाव अर्ध्यावरच सोडून गेले.
अजितदादा यांच्या प्रमाणे राज्याच्या राजकारणातील अनेक बड्या नेत्यांचा असाच अकाली मृत्यू झाला आहे. त्या दुर्दैवी नेत्यांच्या पंक्तीत दादा जाऊन बसले. यापूर्वी डॉ. श्रीकांत जिचकार, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील, विलासराव देशमुख या नेत्यांचाही आयुष्याचा डाव नियतीने असाच अर्ध्यावर मोडून काढला आहे.
आता त्या नेत्यांच्या पंक्तीत लाडके अजितदादा दुर्दैवाने बसले आहेत. विशेष म्हणजे विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात अजितदादा एक कर्तबगार मंत्री म्हणून कार्यरत होते.
आर. आर. पाटील आणि अजितदादा हे अनेक वर्ष एकत्र काम करणारे नेते म्हणून सुपरिचित होते. दोघांची ग्रामीण भागाशी पक्की नाळ जुळली होती. जनतेच्या हितासाठी काहीतरी करण्याची त्यांची भूमिका होती. रोखठोक स्वभाव, मिश्किल वृत्ती यामुळे अजितदादा है प्रचंड लोकप्रिय होते. अभ्यासू वृत्ती, प्रशासनावर पकड अशी दादांची ख्याती होती. त्यांच्या अकाली निधनाने राज्याने एक कर्तबगार नेता गमावला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी अजितदादा यांची प्रामाणिक इच्छा होती. पण ती इच्छा नियतीने पूर्ण केली नाही. विशेष म्हणजे अजित पवार हे राज्याचे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहिले आहेत.
लातूरच्या बाभूळ गावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असा राजकीय प्रवास करून राज्याचे नेतृत्व करणारे विलासराव देशमुख यांचाही अकाली मृत्यू मराठी मनाला चटका लावून जाणारा असाच होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी अतिशय चांगले काम केले. एका दुर्धर आजाराने या उमद्या नेत्याचाही असाच अकाली मृत्यू झाला. आणि विलासराव देशमुख यांचाही डाव असाच अर्ध्यावर मोडून पडला. सर्वपक्षीयांशी त्यांचे असणारे मधुर संबंध, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, अर्थकारण, उद्योग आदी सर्वच क्षेत्रात त्यांचा संचार होता. महाराष्ट्राशी त्यांची नाळ पकी जुळली होती. काँग्रेसशी ते अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिले होते.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री, भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचाही असाच अकाली मृत्यू झाला आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्री असताना मुंबईकडे येतं असताना एका वाहन अपघातात मुंडे यांचा असाच अकाली मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात भाजप सर्वदर पोहोचविण्यात मुंडे यांचे मोठे योगदान होते. सर्वपक्षीयांशी त्यांचे असणारे मधुर संबंध, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, अर्थकारण, उद्योग आदी सर्वच क्षेत्रात त्यांचा संचार होता.
प्रमोद महाजन
भाजपचे नेते प्रमोद महाजन यांचाही असाच अकाली मृत्यू झाला आहे. कौटुंबिक वादातून प्रवीण महाजन या बंधुने प्रमोद महाजन यांची ३ मे २००६ रोजी घरातच गोळ्या झाडून हत्या झाली. महाजन हे महाराष्ट्राचा कर्तबगार चेहरा म्हणून दिल्लीच्या राजकारणात लोकप्रिय होते.
नागपूरचे काँग्रेसचे तरुण आमदार डॉ. श्रीकांत जिचकार यांचाही नागपूर येथे भीषण कार अपघातात २ जून २००४ रोजी निधन झाले होते. अत्यन्त हुशार आणि सर्वात जास्त पदव्या धारण करणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती. राजकारणात कर्तबगार नेता अशी त्यांची ख्याती होती.
महाराष्ट्राच्या राजकारणात अग्रवा या लोकप्रिय नावाने ओळखले जाणारे उमदे व्यक्तिमत्व आर. आर. पाटील उर्फ आबा यांचाही द्याव नियतीने असाच अर्ध्यावर मोडून काढत मराठी मनाला जोरदार धक्का दिला आहे. सांगली जिल्ह्यात दुष्काळ अस्त तासगाव तालुक्यातील अंजनी या छोट्याशा गावात जन्मलेल्या, रोजगार हमी योजनेवर काम करून शिक्षण पूर्ण करणाऱ्या आबा यांचा राजकीय प्रवास अभिमानास्पद असाच होता. ग्रामीण भागाची नस ओळखलेल्या या नेत्याला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकारणात मोठी संधी देत उपमुख्यमंत्री बनविले., ग्रामविकास मंत्री, गृह मंत्री आदी खात्याचा कारभार पाहताना आबांनी स्वच्छता काय असते हे महाराष्ट्राला दाखवून दिले होते. त्यांचाही असाच दुर्धर आजाराने मृत्यू झाला आणि महाराष्ट्रने एक कर्तबगार नेता गमावला.