रायगड: पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री नियुक्ती बाबतचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी 'दैनिक पुढारी' शी बोलताना दिली.
रायगडला पालकमंत्री आहेत. त्यामुळे येथे नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती होणे अपेक्षित नाही. दरम्यान, जाहीर झालेली पालकमंत्र्यांची यादी मी पाहिलेली नाही. त्यामुळे यावर अधिक कामेंट करणे योग्य नाही, असेही तटकरे (Aditi Tatkare) म्हणाल्या.
राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या यादीत आदिती तटकरे यांना डावलण्यात आले आहे. अजित पवार गटाच्या अनेक मंत्र्यांना पालकमंत्री म्हणून संधी देण्यात आलेली आहे. आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक होत्या. त्याचबरोबर अजित पवारही त्यांच्यासाठी आग्रही होते. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचा तटकरे यांना विरोध होता. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदी उदय सामंत यांना कायम ठेवत तटकरे यांना डावलण्यात आले आहे.
हेही वाचा